उपराष्ट्रपती कार्यालय

कुटुंब व्यवस्था आणि नैतिक मूल्यांना प्राधान्य हे भारतीय संस्कृतीचे असामान्य वैशिष्ट्य :उपराष्ट्रपती


कुटुंबातील मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यामधे  सणांची महत्त्वाची भूमिका: उपराष्ट्रपती

तरुण पिढीला सणांचे महत्त्व आणि ऐतिहासिक मूल्यांची जाणीव  करून देण्याची आवश्यकता

बंधू आणि भगिनी यामधील नात्याला नवचैतन्य देण्यासाठी आणि आनंद व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधन हे निमित्त :उपराष्ट्रपती

महामारीने आपल्या विविधरंगी उत्सव साजरे करण्याला घातली खीळ

सामंजस्य आणि काळजीपूर्वक कार्य करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही: उपराष्ट्रपती

Posted On: 03 AUG 2020 5:02PM by PIB Mumbai

 

कुटुंबव्यवस्था आणि नैतिक मूल्यांना  प्राधान्य हे भारतीय संस्कृतीचे असामान्य वैशिष्ट्य आहे आणि कुटुंबातील मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात सणांची महत्त्वाची भूमिका असते, असे उपराष्ट्रपती श्री.एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

आजचा दिवस हा सर्व बंधू आणि त्यांच्या भगिनींसाठी खास दिवस आहे, असे उपराष्ट्रपतींनी आपल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने लिहिलेल्या फेसबुक पोस्ट मधे म्हटले आहे. भावंडांमधील नात्याला नवचैतन्य देण्याचा आणि आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.

तरुण पिढीला आपल्या सणांचे महत्त्व आणि ऐतिहासिक मूल्य  समजावून देण्याची गरज आहे यावर भर देत उपराष्ट्रपती म्हणाले, की  सणांमुळे उचित  मूल्ये आणि  नीतीमत्तेचे महत्त्व त्यांच्या लक्षात येईल.

रामायणातील उदाहरण देत उपराष्ट्रपती म्हणाले, की अनेकानेक वर्षांपासून आपली महाकाव्ये, लोककथा ,सामाजिक चालीरीती आणि सणांनी कौटुंबिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन केले आहे. भारतीय एकत्र कुटुंबपद्धती ही मूल्यांचा  वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुनिश्चित करते एवढेच नाही तर त्यातील विविध घटकांना सामाजिक सुरक्षादेखील बहाल करते."ही व्यवस्था प्रेम, आदर, त्याग आणि कर्तव्य यांचे पोषण करते, असेही ते पुढे म्हणाले. 

करवा चौथ,अहोई अष्टमी,गुरुपौर्णिमा असे भारतातील विविध सण मानवाच्या नातेसंबंधांना साजरे करतात असे सांगत उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, की यावेळी रक्षाबंधन हा सण सर्व जग कोरोना विषाणू विरूद्ध लढत असताना आला आहे .या विषाणूंमुळे लोकांच्या आयुष्यावर आणि उपजिविकेवरच नव्हे तर विविध सण साजरे करण्यावरही परिणाम झाला आहे,असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी घेत विषाणूला हरविण्यासाठी आपण कौटुंबिक आणि सामाजिक समारंभ टाळण्याची गरज असल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले.ते म्हणाले, सामंजस्य आणि काळजी याशिवाय दुसरा पर्याय नाही, यावर त्यांनी भर दिला.

आपल्या विविधरंगी उत्सव साजरे करण्याला या महामारीने आपल्या प्रभावामुळे खीळ घातली आहे  असे  सांगून श्री.नायडू पुढे म्हणाले,आपण सर्वांनी तीव्र इच्छाशक्ती आणि संघटीतपणे कार्य करत विषाणूला हरविण्याची गरज आहे. तोपर्यंत शारीरिक अंतर पाळत सर्वांनी सुरक्षित रहा आणि सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा,असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले आहे.

****

M.Iyangar/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643178) Visitor Counter : 596