विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

देशभरातील पहिलेच सार्स-सीव्हीओ 2 चे 1000 जीनोम सिक्वेन्सिंग यशस्वी पार पडल्याचे डॉ हर्ष वर्धन यांनी जाहीर केले


जैवतंत्रज्ञान विभागाने विक्रमी वेळेत स्थापित केलेल्या पाच कोविड-19 समर्पित बायोरेपॉझिटरीजच्या सर्वात मोठ्या नेटवर्कचा शुभारंभ आणि देशाप्रती समर्पित केले

Posted On: 01 AUG 2020 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी जाहीर केले की, देशभरातील पहिलेच सार्स-सीव्हीओ 2 चे 1000 जीनोम सिक्वेन्सिंग यशस्वी पार पडले. त्यांनी जैवतंत्रज्ञान विभागाची बैठक बोलावून जैवतंत्रज्ञान विभाग, बीआयआरएसी आणि स्वायत्त संस्था (एआयएस) च्या कोविड-19 संबंधी कामांचा आढावा घेतला.

बैठकीदरम्यान डॉ हर्षवर्धन यांनी जैवतंत्रज्ञान विभागाने विक्रमी वेळेत स्थापित केलेल्या पाच कोविड-19 समर्पित बायोरेपॉझिटरीजच्या सर्वात मोठ्या नेटवर्कचा शुभारंभ केला आणि त्यांना देशाप्रती समर्पित केले. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (एनसीसीएस), पुणे, ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (टीएचएसटीआय), फरीदाबाद, इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्स (आयएलएस), भुवनेश्वर, इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस (आयएलबीएस), नवी दिल्ली आणि इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटीव मेडिसीन (इनस्टेम) बेंगळुरु या पाच समर्पित बायोरेपॉझिटरीज आहेत. या महामारीच्या नियंत्रणासाठी अथक युद्ध पुकारल्याबद्दल त्यांनी डिबीटीच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

डॉ हर्षवर्धन म्हणाले, देशभरातील संशोधकांना संशोधनासाठी सिक्वेन्स डेटा जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून लवकरच सामायिक केला जाईल. या माहितीच्या आधारे आपणास विषाणूचा प्रसार समजण्यास मदत होईल त्यावर संक्रमण साखळी तोडणे, नवीन संक्रमणास प्रतिबंध घालणे आणि विविध उपायांवर संशोधन करता येईल. सध्या सुरु असलेल्या माहिती विश्लेषणावर आपल्या कोविड-19 विरोधातील लढाईत मदत म्हणून बरीच रोचक निष्कर्ष समोर येतील.

जैवतंत्रज्ञान विभागाने पॅन इंडिया 1000 सार्स-सीओव्ही 2 आरएनए जिनोम सिक्वेन्सिंग कार्यक्रमाची मे महिन्यात सुरुवात केली होती. डिबीटीच्या स्वायत्त संस्था आणि राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि रुग्णालयीन संस्थांच्या मदतीने हे कार्य पूर्ण केले.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स (एनआयबीएमजी-कल्याणी), पश्चिम बंगाल आणि एनसीसीएस-पुणे यांच्यासह पाच इतर राष्ट्रीय समूह  या समन्वय आणि विश्लेषणामध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. रिअल टाईम पीसीआरने कोविड-19 पॉझिटीव्ह व्यक्तींच्या स्वॅबमधून 1000 एसएआरएस-सीओव्ही-2 जीनोमचे अनुक्रम पूर्ण करण्याचे कन्सोर्टियमने आपले प्रारंभिक लक्ष्य गाठले आहे. देशभरातील 10 राज्यांच्या विविध भागांतून नमुने गोळा केले होते.  

डिबीटी कोविड-19 बायो रेपॉजिटरीजना चांगल्या धोरणात्मक योजनेतून निश्चित काळात तयार केलेल्या नवतंत्रज्ञानातून मदत करत आहेत. आजघडीला, 44,452 रुग्णालय नमुने गोळा करुन या पाच केंद्रांमध्ये ठेवले आहे. तर, 5,000 पेक्षाही अधिक नमुने सामायिक केले आहेत.

डिबीटी-बीआयआरएसी कोविड 19 रिसर्च कॉन्सोर्टियांतर्गत, 150 पेक्षा अधिक गटांचा सुमारे 80 औद्योगिक /शैक्षणिक सहयोग, 40 शैक्षणिक संस्था आणि 25 पेक्षा अधिक स्टार्टअप संशोधन गट आहेत.

कन्सोर्टियमने दररोज 5 लाखाहून अधिक आरटीपीसीआर निदान कीट तयार करुन 100 टक्के स्वालंबन यशस्वी केले आहे. निदान कीटसच्या व्यावसायिक निर्मितीसाठी डीबीटी-स्वायत्त संस्थांचे 4 तंत्रज्ञान उद्योगांना हस्तांतरित करण्यात आले आहे. त्या निदान चाचणी, कीट प्रमाणीकरण आणि अँटीव्हायरल चाचणीसाठी देखील सेवा प्रदान करीत आहेत.

कृपया इथे क्लिक करुन 16 उमेदवारांवरील लसीसंबंधीची माहिती घेऊ शकता.

कोविड-19 ला डिबीटीचा प्रतिसाद.

 

G.Chippalkatti/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1642908) Visitor Counter : 354