इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
नव संशोधन आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यासाठी माय गव्ह कडून 'आत्मनिर्भर भारत लोगो डिझाइन स्पर्धा' चे आयोजन
प्रविष्टि तिथि:
31 JUL 2020 10:02PM by PIB Mumbai
मायगव्ह.इन. वर आयोजित 'आत्मानिर्भर भारत लोगो डिझाइन स्पर्धेच्या ' माध्यमातून देशातील नागरिकांकडून सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण माहितीवर आधारित लोगो विकसित करून केंद्र सरकार 'आत्मनिर्भर भारत अभियाना'साठी अनोखी ओळख निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11.45 पर्यंत आहे. विजेत्या लोगोला 25,000 / -रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल.
मायगव्ह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राच्या कारभारामध्ये आणि विकासात भारतीय नागरिकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेले एक नागरिक सहभागाचे इंटरनेटवरील व्यासपीठ आहे. माय गव्हने आजवर विविध विभागांचे अनेक लोगो तसेच स्वच्छ भारत, देखो अपना देश, लोकपाल आणि इतर उपक्रमांबाबत माहिती संकलित केली आहे.
पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत कल्पनेअंतर्गत भारताने हे दाखवून दिले आहे की तो कशा प्रकारे आव्हानांना तोंड देत पुढे मार्गक्रमण करत आहे आणि यातून निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेत आहे. .भारताने कोविड -19 परिस्थितीचा धैर्याने आणि आत्मनिर्भरतेच्या भावनेने सामना केला आणि हे यावरून लक्षात येते की मार्च 2020 पूर्वीच्या वैयक्तिक संरक्षक उपकरण (पीपीई) च्या शून्य उत्पादनापासून भारताने आज दिवसाला २ लाख पीपीई उत्पादन करण्याची क्षमता निर्माण केली आहे. आणि ही संख्या निरंतर वाढत आहेत.
याव्यतिरिक्त, भारताने हे दाखवून दिले आहे की तो आव्हानांना कसा सामोरा गेला आणि त्याचे संधीत कसे रूपांतर केले. जीवन-रक्षक व्हेंटिलेटर बनविण्यात सहकार्य करण्यासाठी विविध वाहन उद्योग क्षेत्रांच्या नव्या प्रयत्नातून हे सिद्ध झाले आहे.
कोणत्याही शंकांसाठी , कृपया संपर्क साधा: connect@mygov.nic.in
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1642750)
आगंतुक पटल : 203