पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या अंतिम फेरी सोहळ्याला संबोधित करणार
Posted On:
31 JUL 2020 3:18PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या अंतिम फेरी सोहळ्याला एक ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या प्रसंगी ते विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील.
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ आहे. या व्यासपीठामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर उत्पादनाच्या बाबतीतील संशोधन आणि समस्या सोडवण्याच्या दिशेने विचार करण्याची सवय या गोष्टींची रुजुवात होईल. तरुण वर्गाला वेगवेगळ्या वैविध्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने याचा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आहे.
पहिल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2017 मध्ये 42000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ती संख्या 2018 मध्ये 1 लाखांपर्यंत वाढली तर 2019 मध्ये या संख्येने 2 लाखांचा पल्ला गाठला. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या पहिल्या फेरीत 4.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सॉफ्टवेअर एडिशन्सचा भव्य समारोप समारोह यावर्षी ऑनलाईन आयोजित केला आहे. त्यासाठी देशभरातील सर्व सहभागींना विशेष तयार केलेल्या आधुनिक व्यासपीठावर एकत्र आणण्यात आले आहे. 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी हे 37 सरकारी खात्यांमधील 17 राज्यसरकारांकडीलआणि 20 उद्योगांशी संबधीत अश्या एकूण 243 समस्या सोडवण्यासाठी झटत आहेत.
***
U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642561)
Visitor Counter : 234
Read this release in:
Malayalam
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada