संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालय माय जीओव्ही (MyGov) ॲप वर देशातील युवावर्ग आणि जनतेत देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी घेणार प्रश्नमंजूषा
Posted On:
29 JUL 2020 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2020
लवकरच येणाऱ्या 2020 चा स्वातंत्रदिन साजरा करण्याच्या निमित्ताने आत्मनिर्भर भारत ह्या मोहीमेला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येणार आहे. त्या निमित्ताने, युवावर्गामधे तसेच नागरीकांमधे देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी संरक्षण मंत्रालय(MoS)आजपासून ते येत्या 10 ऑगस्टपर्यंत(जुलै29-10ऑगस्ट) माय जीओव्ही ॲपच्या सहयोगाने ‘आत्मनिर्भर भारत-स्वतंत्र भारत’ ही ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेणार आहे.
यात जिंकणाऱ्यांना 10 बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम,द्वितीय, तृतीय आणि सात उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत.
(a) प्रथम क्रमांक Rs 25,0000/
(b)द्वितीय क्रमांक Rs 15,000/
(c)तृतीय क्रमांक Rs 10000/
(d)उत्तेजनार्थ (सात) Rs 5,000/
14 वर्षे आणि अधिक वयाचे कुणीही भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.ही प्रश्नमंजूषा MyGov पोर्टल वर या लिंकवर जाऊन पहाता येईल.
https://quiz.mygov.in/quiz/aatmanirbhar-bharat-swatantra-bharat-quiz/
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642166)
Visitor Counter : 122