भारतीय निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Posted On: 28 JUL 2020 10:04PM by PIB Mumbai

 

द ट्रिब्यून वृत्तपत्रात आज म्हणजेच 28 जुलै, 2020 रोजी "परिसीमन के बाद जम्मू-कश्मीर में चुनाव" शीर्षकाखाली जम्मू आणि कश्मीर चे नायब राज्यपाल जी.सी. मुर्मू यांचा लेख प्रकाशित झाला आहे. नायब राज्यपालांचे याच अर्थाचे वक्तव्य यापूर्वी द हिंदू मध्ये दिनांक 18.11.2019, न्यूज- 18 मध्ये दिनांक 14.11.2019, हिंदुस्तान टाइम्स मध्ये 26.6.2020 आणि इकोनॉमिक टाइम्स (ई-पेपर) मध्ये दिनांक 28.7.2020 रोजी प्रकाशित झाले होते. निवडणूक आयोगाने अशा वक्तव्याचे खंडन केले असून निवडणूक तारखा ठरवण्याचा अधिकार केवळ निवडणूक आयोगालाच असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणूक कालावधी ठरवण्यापूर्वी आयोग निवडणूक असलेल्या ठिकाणांची, तिथले हवामान आणि क्षेत्रीय तसेच स्थानीय उत्सवांमुळे निर्माण होणारी संवेदनशीलता यासारख्या गोष्टी विचारात घेत असतं. उदाहरणादाखल कोविड-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती सध्या विचारात घ्यावी लागेल. सध्याच्या परिस्थितीत परिसीमनचा मुद्दा देखील निर्णय घेण्यापूर्वी विचारात घ्यावा लागेल. याचप्रमाणे केंद्रीय पोलीस दल आणि रेल्वेचे डबे इत्यादींची उपलब्धता विचारात घ्यावी लागेल. हे सर्व आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विचारपूर्वक ठरवले जाते आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत सल्ला मसलतीनंतर त्याचे विस्तृत आकलन केले जाते. आयोग स्वतः निवडणूक असलेल्या त्या राज्यांचा दौरा करते जेथे जाणे गरजेचे आहे तिथे जाऊन संबंधितांशी विस्तृत चर्चा करते. निवडणूक आयोगाच्या व्यतिरिक्त इतर अधिकार्‍यांनी असे विधान करणे टाळले पाहिजे जे निवडणूक आयोगाच्या घटनात्मक आदेशात हस्तक्षेप करण्यासारखेच आहे.

*****

B.Gokhale/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641949) Visitor Counter : 190