विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

बंगळुरू स्थित स्टार्टअपने कोविड 19 बाधित व्यक्तींच्या शोध आणि जोखीम मूल्यमापनासाठी आणले मोबाइल अ‍ॅप


हे शरीरातील सिग्नल प्राप्त करण्यासाठी स्मार्टफोन प्रोसेसर आणि स्मार्टफोन सेन्सरची ताकद वापरते

Posted On: 28 JUL 2020 6:10PM by PIB Mumbai

 

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर तपासणीच्या माध्यमातून पारंपारिक चाचणीला प्राधान्य देण्यासाठी रोगाचे लवकर निदान आणि संसर्गजन्य लोकांच्या जोखमीच्या मूल्यमापनासाठी  पूरक नाविन्यपूर्ण पद्धती शोधणे हे एक महत्वपूर्ण आव्हान आहे . संकटाचा सामना करण्यासाठी तांत्रिक उपयांची  आवश्यकता आहे ज्यातून आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी  जोखीम कमी करून जलद गतीने चाचण्या पार पाडू शकतील

सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड -19 हेल्थ क्रिसिस (कवच ), या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) उपक्रमाने लिफास कोविड स्कोअर नावाचे कोविड जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल विकसित करण्यासाठी बंगळुरूमधील स्टार्टअप अकुली लॅबची निवड केली आहे. अकुली लॅब कडे लवकर निदान मूळ कारण विश्लेषण, तीव्र जोखीम मूल्यांकन, रोगनिदान आणि दीर्घकालीन रोगांवर घरी देखरेख यासाठी 'लिफास' हे  क्लिनीकल-ग्रेड, नॉन-इन्व्हेसिव्ह , डिजिटल फंक्शनल बायोमार्कर  स्मार्टफोन साधन आहे.

राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळ (एनएसटीईडीबी), डीएसटी, केंद्र सरकार यांचा कवच हा उपक्रम कोविड  च्या नियंत्रणासाठी बाजारात आणण्यासाठीच्या  नवकल्पना आणि स्टार्टअप कल्पनांना बळ देत आहे.

डीएसटीच्या मदतीने  विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान परंपरागत चाचणीला प्राधान्य देण्यासाठी लक्षणे नसलेल्या व्यक्तीमधील संभाव्य संसर्ग शोधेल तसेच लक्षणे न आढळणारी व्यक्ती बाधित होण्याच्या जोखमीचे मूल्यमापन करेल.

मार्च 2020  मध्ये, केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने कोविड समस्येचे निराकरण करणार्‍या तंत्रज्ञानाचे समर्थन करण्यासाठी सहकार्य केले. मोठ्या प्रमाणावर  संशोधन करण्याच्या दिशेने उपाय शोधण्यासाठी चाचण्यांच्या अनेक फेऱ्यांनंतर अकुली लॅबची निवड झाली.त्यांच्या  लिफास या उत्पादनास विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून 30 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे आणि आता आयआयटी मद्रास, हेल्थकेअर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर (एचटीआयसी), मेडटेक इनक्यूबेटर यांनी आभासी पाठिंबा दिला आहे.

लिफास हे एक अँड्रॉइड ऍप्लिकेशन  आहे ज्यात एखादी व्यक्ती मोबाइल फोनच्या मागील फोन कॅमेर्‍यावर 5  मिनिटे बोट ठेवते तेव्हा ते कपिलारी नाडी आणि रक्ताची मात्रेतील बदल टिपते. आणि  अल्गोरिदम आणि सिग्नल प्रक्रिया तंत्रांसह 95 बायोमार्कर्स मिळते. शरीरातील  सिग्नलचा एक समूह कॅप्चर करण्यासाठी स्मार्टफोन प्रोसेसर आणि स्मार्टफोन सेन्सरची उर्जा हे वापरते. त्यानंतर फोटोप्लेथिस्मोग्राफी  (पीपीजी), फोटो क्रोमॅटोग्राफी (पीसीजी), अर्टेरिअल फोटोप्लेथीस्मोग्राफी (एपीजी), मोबाइल स्पायरोमेट्री आणि पल्स रेट व्हेरिएबिलिटी (पीआरव्ही) या तत्त्वावर सिग्नलवर प्रक्रिया केली जाते.

त्यानंतर लिफास कार्डियो-श्वसन, हृदय-रक्तवहिन्यासंबंधी, रक्तविज्ञान, रक्तस्त्राव, न्यूरोलॉजी आधारित पॅरामीटर्स प्रदान करते जे शरीरातील सूक्ष्म पॅथोफिजियोलॉजिकल बदलांचा मागोवा घेण्यास सक्षम असतात. हे बदल पुढे ऑर्गन सिस्टम-व्यापी प्रतिसादामध्ये व्यक्त केले जातात

हे  तंत्रज्ञान लोकसंख्या तपासणी, विलगीकरण केलेल्या व्यक्तींवर देखरेख आणि समुदाय प्रसार टप्प्यावर देखरेख ठेवण्यावर केंद्रित आहे. मेदांता मेडिसिटी रुग्णालयात केलेल्या अभ्यासात 92% अचूकता, 90% ची विशिष्टता आणि  92%  ची संवेदनशीलतेसह लक्षणे आढळून न आलेल्या व्यक्ती शोधते हे  सिद्ध झाले आहे.

अभ्यासाच्या यशाचे साक्षीदार म्हणून, मेदांता नीतिशास्त्र समितीने मोठ्या लोकसंख्या अभ्यासासाठी त्याला  मान्यता दिली आहे. या अभ्यासाची सध्या क्लिनिकल ट्रायल्स रेजिस्ट्री-इंडिया (सीटीआरआय) मध्ये नोंदणी झाली आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याला  मान्यता दिली आहे. आरोग्यासेतु संपर्क शोधावर काम करते जिथे एखाद्याला आपली लक्षणे प्रविष्ट करावी लागतात, लिफास एक योग्य वैद्यकीय तपासणी चाचणी आहे जी पूर्णपणे चाचणीच्या परिणामांवर अवलंबून असते.

स्वस्त, सुगम्य, पॉईंट ऑफ केअर स्मार्ट फोन आधारित निदान हे एक शक्तिशाली साधन आहे जे उच्च जोखीम रुग्ण ,विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर निरंतर देखरेख ठेवण्यासाठी आणि सामान्य पाळत ठेवण्यासाठी मोठी  मदत करेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा म्हणाले, "उद्भवणार्‍या आव्हानांसाठी वेगवान आणि कार्यक्षमतेसह प्रासंगिक आणि सर्जनशील उपाय शोधण्यात तंत्रज्ञान स्टार्टअपच्या वाढत्या शक्तीचे लिफास हे एक उदाहरण आहे,"

क्लिनिकल चाचण्या आणि नियामक कार्यवाही सप्टेंबरच्या अखेरीस पूर्ण  होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर चाचणीची सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करुन दिली जाईल.

जागतिक स्तरावर आणि भारतात कोविड19 चा प्रादुर्भाव पाहता, संकटाचा सामना करण्यासाठी संशोधन आणि विकास प्रयत्नांना पाठबळ देण्याची आणि अर्थव्यवस्थेचे आणखी नुकसान होऊ न देणे ही काळाची गरज आहे. केंद्र सरकारचा  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) स्टार्टअप-परिसंस्थेद्वारे सर्वसमावेशक उपाय पुरवणाऱ्या नवकल्पनांना सहाय्य करत आहे आणि त्यातील एक उपाय म्हणजे लिफास कोविड स्कोअर हा आहे. 

****

B.Gokgale/S.KaneP.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641838) Visitor Counter : 263