इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

‘आत्मनिर्भर भारत ॲप इनोव्हेशन चॅलेंज’साठी 6,940 प्रवेशिका प्राप्त

Posted On: 27 JUL 2020 7:15PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 4 जुलै रोजी प्रारंभ केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत ॲप इनोव्हेशन चॅलेंज’ला देशभरातल्या तंत्रज्ञ उद्योजक आणि स्टार्टअप्सकडून अतिशय उत्साही प्रतिसाद मिळाला आहे. आव्हानामध्ये सहभागी होण्यासाठी दि. 26 जुलै ही अंतीम तारीख देण्यात आली होती. या काळामध्ये वेगवेगळ्या आठ श्रेणींमध्ये 6,940 प्रवेशिका आल्या आहेत. यामध्ये 3939 जणांनी व्यक्तिगत प्रवेशिका दाखल केल्या आहेत. तर 3,001 वेगवेगळ्या कंपन्या आणि संस्थांचा समावेश आहे. आलेल्या प्रवेशिकांपैकी 1,757 अॅप त्वरित वापरण्यासाठी तयार आहेत. तर उर्वरित 2182 विकसित करण्यात येत आहेत. संस्थांनी सादर केलेल्या अॅप्सपैकी1742 अॅप आधीपासून वापरण्यास प्रारंभ करण्यात आले आहेत. तर उर्वरित 1259 अॅप विकसित करण्याचे काम सुरू आहे. प्रवेशिकांचे वर्गीकरण वेगवेगळ्या आठ श्रेणींमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये 1142 व्यावसायिक, 901 आरोग्य आणि कल्याण, 1062 ई-शिक्षण, 1155 सोशल नेटवर्किंग, 326 खेळ, 662 कार्यालयीन कामकाज आणि घरामधून कार्यालयाचे काम करणे यासाठी, 237 बातम्या आणि 320 मनोरंजन यांचा समावेश आहे. जवळपास 1135 अॅप्सच्या प्रवेशिका इतर श्रेणीमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. तसेच जवळपास 271 अॅप्स 100,000 पेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. तर 89 अॅप्स दशलक्षाहून जास्त डाउनलोड झालेले आहेत. या सर्व प्रवेशिका संपूर्ण देशभरातून आल्या आहेत, त्यामध्ये अगदी दुर्गम भागातल्या तंत्रज्ञांचाही  समावेश आहे.

अॅप्स तंत्रज्ञाना दिलेल्या या आव्हानामुळे आपल्या देशातल्या लोकांमध्ये किती प्रचंड प्रतिभा आहे, हे लक्षात आले आहे. आता हे अॅप्स उपयुक्त आणि आपल्या प्रश्नांना ओळखून त्यांच्या सोडवणुकीसाठी वापरणे सोईचे ठरणे गरजेचे आहे. तसेच हाताळण्यास अतिशय सुकर असावीत आणि वापरकर्त्यांना चांगला अनुभव देणारी असली पाहिजेत. यासाठी एक मूल्यांकन समिती नियुक्त करण्यात आली असून या अॅप्सच्या मूल्यांकनाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. वेगवेगळ्या मानकांनुसार अॅप्स तपासण्यात येत आहेत.

आत्मनिर्भर भारत अॅप इकोसिस्टिममध्ये भारतीय तंत्रज्ञानाच्या स्टार्टअप्सचे महत्व आहे. या अॅप अर्थकारणामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला झालेले नुकसान भरून काढण्याची क्षमता आहे. यावर्षी जे अॅप्स जास्तीत जास्त डाउनलोड झाले आहेत. त्यामध्ये फक्त तीन कंपन्या अव्वल आहेत. या तीन कंपन्यांकडे जवळपास दोन ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ आहे. अॅपची बाजारपेठ अतिशय वेगाने वाढत आहे.

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641757) Visitor Counter : 199