विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जैवतंत्रज्ञान विभागाने सहाय दिलेल्या रीकॉम्बीनंट बीसीजी लस VPM1002 च्या चाचणीसाठी 6000 आरोग्य कर्मचारी आणि उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींची नावनोंदणी पूर्ण

Posted On: 27 JUL 2020 10:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2020


जैव तंत्रज्ञान विभागाच्या नॅशनल बायोफार्मा मिशन अंतर्गत रीकॉम्बीनंट  बीसीजी लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या आयोजित करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसआयआयपीएल) ला सहाय्य देण्यात आले आहे. या चाचणीचा हेतू उच्च-जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा सह-आजार आणि उच्च-जोखीम असणार्या आरोग्यसेवा (एचसीडब्ल्यू) कर्मचाऱ्यांमधील संसर्ग कमी करणे आणि कोविड-19 चे गंभीर परिणाम कमी करण्यामध्ये व्हीपीएम 1002 च्या क्षमतेचे मूल्यांकन करणे हा आहे.

क्षयरोग (टीबी) रोग रोखण्यासाठी राष्ट्रीय बालपण लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून सर्व नवजात शिशुंना बीसीजी लसी नियमितपणे दिल्या जातात. हा रोग प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करणाऱ्या जीवाणूंमुळे होतो. (आरबीसीजी) विषाणू लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढू शकते किंवा नाही हे तपासण्यासाठी कोविडच्या रूग्णांशी निकटचा संपर्क आलेल्या जवळपास 6,000 आरोग्य कर्मचारी आणि उच्च जोखमीच्या व्यक्तींची नावे क्लिनिकल चाचणीमध्ये नोंदवली आहेत.

या विषयावर बोलताना बीआयआरएसीच्या सचिव डॉ. रेणु स्वरूप म्हणाल्या, बीसीजी लस ही एक तपासून घेतलेले औषध आहे आणि टीबी व्यतिरिक्त इतर रोगांवर त्याचे लक्ष्यित परिणाम शोधणे  हा एक अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन आहे. मे 2020 मध्ये या प्रयोगाला सुरुवात झाली आणि देशभरातील सुमारे 40 रुग्णालयांमधील 6000 लोकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. हा आजार रोखण्याच्या मार्गांचा शोध घेणारा हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि आम्ही या महत्त्वपूर्ण परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहोत. ”

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदर  पूनावाला म्हणाले, "आम्ही या अभ्यासामध्ये डीबीटी - बीआयआरएसी बरोबर भागीदारी करून आनंदी आहोत आणि या वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होणाऱ्या चाचणीच्या सकारात्मक निकालांची अपेक्षा करतो."

साथीच्या रोगाशी लढण्यासाठी अग्रभागी असलेले उच्च-जोखीम असलेले आरोग्य कर्मचारी, कोविड संसर्गित रूग्णांचा घरगुती संपर्क असलेले आणि कोविड–19 हॉटस्पॉट्स / प्रभावित भागात राहणारे किंवा काम करणारे, ज्यांना कोविड -19 संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे अशा लोकांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. पॉल एरलिच इन्स्टिट्यूट (पीईआय) आणि हेल्थ कॅनडा यांनीही आरबीसीजीच्या अशाच प्रकारच्या चाचण्यांना मान्यता दिली आहे.

 

* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1641692) Visitor Counter : 17