संरक्षण मंत्रालय
भारत आणि इंडोनेशिया यांच्यात द्वीपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांच्या संवादात सहमती
Posted On:
27 JUL 2020 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2020
भारत आणि इंडोनेशियाच्या संरक्षणमंत्र्यांदरम्यान आज संवाद पार पडला. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले तर इंडोनेशियाचे शिष्टमंडळ संरक्षणमंत्री जनरल प्राबोवो सुबिअन्तो यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे संरक्षणंत्री सागरी शेजारी राष्ट्रांमध्ये संबंध मजबूत करण्यासाठी भारत दौऱ्यावर आहेत.
चर्चेदरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी दोन्ही देशांच्या राजकीय संवादातील जवळीकता, आर्थिक आणि व्यापार समानता तसेच सांस्कृतिक आणि परस्पर राष्ट्रांतील जनतेचा संवाद याचा पुनरुच्चार केला.
लष्कर ते लष्कर संवादाबद्दल समाधान व्यक्त करत राजनाथ सिंग यांनी निर्देशित केले की, अलिकडच्या वर्षांत भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या संरक्षण सहकार्यात वाढ झाली आहे, जी दोन्ही बाजूंच्या व्यापक व्युहात्मक भागीदारीशी सुसंगत आहे. परस्पर मान्य केलेल्या क्षेत्रात द्वीपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढविण्याबाबत दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शविली.
दोन्ही देशांनी संरक्षण उद्योग आणि संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य संभाव्य क्षेत्रांचा शोध घेतला आहे. दोन्ही मंत्र्यांनी द्वीपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी उच्च पातळी गाठण्याची कटीबद्धता व्यक्त केली.
दोन्ही देशांमधील द्वीपक्षीय सहकार्याची व्याप्ती अधिक दृढ आणि विस्तृत करण्याच्या प्रतिबद्धतेसह ही बैठक सकारात्मक मुद्यांवर पार पडली.
संरक्षणदल प्रमुख आणि सैन्य व्यवहार विभागाचे सचिव जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख एम एम नरवणे, नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग, हवाईदल प्रमुख एअर मार्शल आर के एस भदौरिया आणि संरक्षण मंत्रालयाचे सचिव डॉ अजय कुमार आणि नागरी विभाग आणि लष्करी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्वीपक्षीय बैठकीत भाग घेतला होता.
* * *
M.Chopade/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1641681)
Visitor Counter : 233