पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

जागतिक व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री व्याघ्रगणनेचा सविस्तर अहवाल प्रसारित करणार

Posted On: 27 JUL 2020 8:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2020

 

जागतिक व्याघ्र दिन, 2020 च्या पूर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र अंदाज – 2018 चा सविस्तर अहवाल जाहीर करणार आहेत.
नॅशनल मिडीया सेंटर, नवी दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://youtu.be/526Dn0T9P3E  या संकतेस्थळावर 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील सुमारे 500 जण सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

 

वाघांचा वावर असणाऱ्या देशातील सरकारच्या प्रमुखांनी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथे जागतिक पातळीवर वाघांची संख्या 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्धार सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करुन केला आहे. याच बैठकीत 29 जुलै हा दिवस जगभर जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरुन व्याघ्र संवर्धनाविषयी जागृती निर्माण होईल.

गेल्यावर्षी याच दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाघांची संख्या दुप्पट करण्यातील भारताचे  यश , सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्र 2010 मध्ये जाहीर केल्याच्या चार वर्ष अगोदर प्राप्त केल्याचे जाहीर केले. सध्या जागतिक संख्येच्या सुमारे 70% वाघ भारतात आहेत.

पर्यावरण मंत्री जंगली मांजर  जातीतील छोट्या प्राण्यांवर एक पोस्टर प्रकाशित करतील.

वरील कार्यक्रम https://youtu.be/526Dn0T9P3E  या संकेतस्थळावर पाहता येईल.


* * *

MI/MC/SRT/SM/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641552) Visitor Counter : 230