इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

माय गव्हर्मेंट चळवळ पुढे न्यायला हवी: केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

Posted On: 26 JUL 2020 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जुलै 2020

माय गव्हर्मेंट या चळवळीला आज सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय न्याय, विधी, संदेशवहन ,इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणालेत कीमाय गवर्नमेंट ही चळवळ पुढे न्यायला हवी आज मीतीला तिचे जवळपास 12 दशलक्ष प्रतिनिधी, उपयोग कर्ते असून या सहा वर्षात नागरिक आणि प्रशासनाच्या सहभागा द्वारे  माय गव्हर्मेंट चळवळ यशस्वी होण्यास मदत मिळाली आहे.

माय गव्हर्मेंट या चळवळीने केलेल्या कामाची प्रशंसा करतांना रवी शंकर प्रसाद म्हणालेत की माय गव्हर्मेंट द्वारे प्रत्येक म्युनिसिपल कार्पोरेशन प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक  पंचायत तसेच समाजातील प्रत्येक नागरिकांना हा प्लॅटफॉर्म, त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी उपलब्ध करून द्यायला हवा. ते पुढे म्हणाले की माय गव्हर्मेंट द्वारे  डिजिटल, सांख्यिकी विश्लेषण परिणामकारक पद्धतीने करून नागरिकांद्वारे मिळालेल्या सूचना आणि कल्पना या संबंधित विभागाला कळवून त्याद्वारे कृतिशील कार्यक्रम राबविता येतील.

या ऑनलाईन कार्यक्रमात मनुष्यबळ विकास राज्यमंत्रीसंजय  धोत्रे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अजय स्वहाय, माय गव्हर्मेंट चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग हे यावेळी उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून आसाम, उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

आतापर्यंत बारा राज्यात माय गव्हर्मेंट चालू झाले असून इतर राज्ये माय गव्हर्मेंट चालू करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत.

यामुळे नागरिकांची माहिती मिळण्यास मदत झाली असून त्यामुळे सरकारला कार्यक्रम आणि योजनांचा विकास तसेच नागरिकांच्या मुख्य समस्यांकडे लक्ष देण्यास मदत होत आहे. यामुळे नागरिक आणि सरकार यांच्यातील परस्परांमधील संबंध वृद्धिंगत होण्यास मदत होत असुन सरकारची प्रतिमा सुधारली जाणार आहे.

माय गव्हर्मेंट आज विविध प्रकारच्या गुंतवणूकीच्या मॉडेल सह तसेच शासनाच्या विविध फ्लागशिप प्रोग्राम परफॉर्मन्स इंडिकेटर ऑफर देणारे एक परिपूर्ण व्यासपीठ म्हणून विकसित झाली आहे कोरोनाच्या या कठीण काळात आज माय गव्हर्मेंट मुळे नागरिकांसाठी माहितीचा विश्वासहार्य स्त्रोत बनला आहे वेळेवर आणि अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी गव्हर्मेंट चमूने व्यापक कार्य केले आहे असे मंत्री महोदय म्हणालेत.

 

B.Gokhale/ P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641456) Visitor Counter : 158