ऊर्जा मंत्रालय

भारताच्या पहिल्या सार्वजनिक ईव्ही चार्जिंग प्लाझाचे केंद्रीय उर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 20 JUL 2020 11:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जुलै 2020

उर्जा कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आणि ई वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय उर्जा, नूतन आणि पुनर्नवीकरणीय उर्जामंत्री आर के सिंग यांनी आज देशातील पहिल्या इव्ही( इलेक्ट्रिक व्हेईकल) चार्जिंग प्लाझाचे नवी दिल्लीतील चेम्सफर्ड क्लब येथे उद्‌घाटन केले. देशात इलेक्ट्रिक वाहनांना लोकप्रिय करण्यासाठी आणि सुविधाजनक बनवण्यासाठी हा ईव्ही चार्जिग प्लाझा एक नवे दालन ठरेल असा विश्वास यावेळी बोलताना सिंग यांनी व्यक्त केला.

इलेक्ट्रिक वाहन खरेदीच्या मागणीत वाढ करण्यासाठी आणि  सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सच्या संख्येत वाढ करण्यासाठी नावीन्यपूर्ण व्यावसायिक उपक्रम निर्धारित करण्याच्या उद्देशाने भारतात इलेक्ट्रिक वाहनांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी ईईएसएल सातत्याने प्रयत्नशील आहे. एनडीएमसीच्या सहकार्याने ईईएसएलने भारतातील पहिलावहिला सार्वजनिक  इव्ही चार्जिंग प्लाझा मध्य दिल्लीत उभारला आहे. या प्लाझामध्ये विविध आकारमानाच्या पाच इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची सोय आहे.

आर के सिंग यांनी यावेळी अंतर्गत भागातील हवेच्या दर्जात सुधारणा करणाऱ्या आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणाऱ्या एका रिट्रोफिट एयर कंडिशनिंग प्रणाली रेझ या कार्यक्रमाचे देखील द्‌घाटन केले. रेझ या उपक्रमामुळे देशभरात कामाच्या ठिकाणी निर्माण होणारी दूषित हवा शुद्ध करण्यासाठी आणि वातावरण अधिक निरोगी आणि हरित बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, अशी अपेक्षा सिंग यांनी यावेळी व्यक्त केली.

देशभरात हवेचा खालावलेला दर्जा हा बऱ्याच काळापासून चिंतेचा विषय बनला आहे आणि कोविड महामारीच्या काळात तर या विषयाला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी लोक आपल्या कार्यालयांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणांमध्ये पुन्हा दाखल होतील त्यावेळी त्यांच्या आरामासाठी, त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आणि उत्पादकतेसाठी आणि एकंदर चांगल्या सार्वजनिक आरोग्यासाठी तेथील हवेचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे.

या संदर्भात ईईएसएलने कार्यालयातील वातानुकूलन आणि वायुविजन प्रणालीशी संबंधित रेझ हा उपक्रम सुरू केला आहे. सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने अंतर्गत भागातील हवेच्या दर्जात सुधारणा करण्याच्या एका मोठ्या कार्यक्रमाचा हा एक भाग आहे. आरोग्यदायी आणि उर्जा कार्यक्षम इमारतींसाठी यूएसएड अर्थात आंतरराष्ट्रीय विकासासाठी अमेरिकेची मदत या संस्थेच्या सहकार्याने मैत्री हा कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे.

 

M.Chopade/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1640091) Visitor Counter : 140