विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारत-अमेरिकेमधील राजनैतिक उर्जा भागीदारीविषयक मंत्रीस्तरीय बैठकीत महत्वाच्या उपलब्धीवर भर; नव्या सहकार्य क्षेत्रांचा प्राधान्यक्रम निश्चित
Posted On:
18 JUL 2020 3:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2020
भारत आणि अमेरीकेने परिवर्तनीय उर्जानिर्मितीच्या क्षेत्रात संशोधनाच्या नव्या संधींवर भर देण्याची घोषणा केली आहे. हे संशोधन अतिमहत्त्वाच्या कार्बन डायऑक्साईड आणि अत्याधुनिक कोळसा तंत्रज्ञानावर-ज्यात कार्बन जमा करणे, त्याचा वापर आणि साठा करणे हे ही, अंतर्भूत आणि आधारित असेल.
भारत-अमेरिका राजनैतिक उर्जा भागीदारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही देशांत 17 जुलै 2017 रोजी मंत्रीस्तरीय बैठक झाली. यात महत्वाच्या उपलब्धीवर भर देणे आणि सहकार्याच्या नव्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम ठरवणे यावर भर देण्यात आला. अमेरिकेचे उर्जा सचिव डेन ब्र्लोलीएट आणि भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
या बैठकीला, अमेरिकेचे उर्जा सचिव ,ध्रमेंद्र प्रधान यांच्याशिवाय, भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्तर, अमेरिकेतील भारीय राजदूर तरणजीत संधू आणि विज्ञान-तंत्र्ज्ञान विभागाचे सचिव आशुतोष शर्मा सहभागी झाले होते.
यावेळी बोलतांना, आशुतोष शर्मा म्हणाले की, भारत आणि अमेरिकेदरम्यानचे सहकार्य गेल्या काही अनेक वर्षात स्वच्छ उर्जानिर्मितसाठी अत्यंत महत्वाचे ठरले आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये स्मार्ट ग्रीड आणि उर्जा साठवणूक याबाबतच्या सहकार्याअंतर्गत,
भारत आणि अमेरिकेतील 30 घटकांना एकत्रित आणण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी प्रत्येकी 7.5 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तसेच यासाठी तयार करण्यात आलेल्या 30 सदस्यीय समूहानेही यात तेवढीच गुंतवणूक केली आहे.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639617)
Visitor Counter : 219