पंचायती राज मंत्रालय
अर्थ मंत्रालयाने 15 जुलै 2020 रोजी 28 राज्यांतील 2.63 लाख ग्रामीण स्थानिक संस्थांना 15187.50 कोटी रुपयांचे अनुदान दिले; ही रक्कम 15 व्या वित्त आयोगाने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी शिफारस केलेल्या अनुदानाचा एक भाग आहे
Posted On:
16 JUL 2020 11:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2020
पंचायती राज मंत्रालय, पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालयाच्या शिफारशी नुसार अर्थ मंत्रालयाने 15 जुलै 2020 रोजी देशभरातील 28 राज्यातील 2.63 लाख ग्रामीण स्थानिक संस्थाना (आरएलबी) 15187.50 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. हे अनुदान हे आर्थिक वर्ष 2020-21 कालावधीसाठी पंधराव्या वित्त आयोगाने (एक्सव्ही-एफसी) शिफारस केलेल्या बद्ध (टाईड) अनुदानाचा एक भाग आहे. आरएलबीद्वारे या अनुदानाचा वापर मुख्यत्वे करून पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासंदर्भातील विविध विकासकामे, जलसंधारण, पाण्याचा पुनर्वापर, स्वच्छता व गावात हागणदारीमुक्त स्थितीवर देखरेख ठेवणे, यासारख्या राष्ट्रीय प्राधान्ये असलेल्या कामांसाठी वापरला जाईल.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास व पंचायती राज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यावेळी म्हणाले, की ग्रामीण स्थानिक संस्था सध्या कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या आव्हानांचा सामना करीत असतानाच योग्य वेळी हा निधी देण्यात आला आहे. आरएलबीकडे हा निधी उपलब्ध झाल्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सेवा देण्याच्या त्यांच्या प्रभावी धोरणांना अधिक चालना मिळेल. कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आपल्या मूळ गावी परतलेल्या स्थलांतरित कामगारांना फायदेशीर रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच ग्रामीण पायाभूत सुविधांना विधायक मार्गाने पुढे मार्गक्रमित करण्यास सहाय्य मिळेल.
अधिक तपशील देताना तोमर म्हणाले की, पंचायती राज मंत्रालयाच्या शिफारशीनुसार अर्थ मंत्रालयाने 17 जून 2020 रोजी देशभरातील 28 राज्यातील 2.63 लाख ग्रामीण स्थानिक संस्थाना (आरएलबी) 15187.50 कोटी रुपयांचे अनुदान जारी केले होते. हे अनुदान आर्थिक वर्ष 2020-21 या कालावधीसाठी पंधराव्या वित्त आयोगाने शिफारस केलेल्या अमर्यादित अनुदानाचा एक भाग होता, जे आरएलबीने स्थान-विशिष्ट कारणांसाठी वापरले.
पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाचा प्रभावी उपयोग व्हावा, यासाठी पंचायती राज मंत्रालय राज्यांना सक्रीय सहाय्य करेल, यासाठी त्यांना नियोजन, देखरेख, लेखा / लेखापरीक्षण आणि आरएलबीच्या प्रत्येक स्तरावर निधीचा प्रवाह सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने वेब / आयटी सक्षम मंच उपलब्ध करुन देण्यात येईल.
* * *
S.Pophale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639583)