विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

एस एन बोस राष्ट्रीय मूलभूत विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या दोन कोविड-19 तंत्रज्ञानाचे एन आर डी सी कडून हस्तांतरण

Posted On: 17 JUL 2020 3:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2020

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि उद्योग संशोधन विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ- एन आर डी सी ने याच मंत्रालयाच्या अधीन असलेली स्वायत्त संस्था, एस एन बोस राष्ट्रीय मूलभूत विज्ञान संस्था, कोलकाताने विकसित केलेल्या दोन कोविड-19 शी संबंधित तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी, त्याबाबत  मेसर्स पौलमेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार केला आहे.

ही दोन तंत्रज्ञान म्हणजे:-

  1. विनासायास आणि स्वच्छ श्वासोच्छवास घेण्यासाठी मदत करणारे व्हॉल्व्ह  आणि हवेत तरंगत असलेल्या कणांनाही गाळून (फिल्टर करणारे) स्वच्छ हवा देणारे सक्रीय श्वसन यंत्र
  2. डीस्पेन्सिंग सूक्ष्मजीव रोधी थर असलेले, दीर्घकाळ चालणारे नैनो सैनिटायझर

या सक्रीय श्वसन मास्कमध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकणे, हवेतील आर्द्रता दूर ठेवणे आणि मास्कच्या आत घाम किंवा उष्ण वाटणार नाही, अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे मास्क लावून सुद्धा व्यक्तीला नीट बोलता येऊ शकेल, तसेच स्वच्छ आणि शुद्ध हवा मिळू शकेल. त्यासोबतच, हवेतून होणाऱ्या कुठल्याही संसर्गापासून संरक्षण मिळू शकेल.

दीर्घकाळ चालणाऱ्या या विशेष  नैनो सैनीटायझरमुळे त्वचा कोरडी होणार नाही तसेच इतर सामान्य सैनीटायझर जसे तेवढ्या क्षणापुरते काम करतात, त्यापेक्षा अधिक काळ या नैनो  सैनीटायझरमुळे संरक्षण मिळू शकेल. या नवीन संशोधनामुळे दीर्घकाळ टिकणारे सैनीटायझर उपलब्ध होऊ शकतील.

NDRC चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ पुरुषोत्तम आणि मेसर्स पौलमेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक रंजन पौल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या दोन्ही उत्पादनांमुळे लोकांना सध्या मास्क आणि सैनिटायझर वापरण्यात येत असलेल्या समस्यांवर तोडगा मिळू शकेल.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639329) Visitor Counter : 191