आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जागतिक आरोग्य संघटनेने दर दहा लाख लोकसंख्येमागे 140 चाचण्या प्रतिदिन करण्याचा सल्ला दिला
22 राज्ये /केंद्रशासित प्रदेशात दर दहा लाख लोकसंख्येमागे 140 चाचण्या प्रतिदिन करण्यास सुरुवात झाली
दर दहा लाख लोकसंख्येमागे 8994 च्या पेक्षा जास्त चाचण्या
Posted On:
15 JUL 2020 5:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2020
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या 'covid-19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य व सामाजिक उपाययोजनांशी जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना' अंतर्गत संसर्गाचा संशय असलेल्या क्षेत्रांमध्ये अधिक तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. सर्वसमावेशक तपास (Comprehensive surveillance) या संकल्पनेबद्दल व संशयित रुग्णांच्या तपासणी बद्दल सांगताना जागतिक आरोग्य संघटनेने दर दहा लाख लोकसंख्येमागे प्रतिदिन 140 चाचण्यांची देशाला गरज असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार व राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित प्रयत्नातून 22 राज्य व केंद्रशासित प्रदेशात दर दहा लाख लोकसंख्येमागे 140 किंवा त्याहून जास्त चाचण्या केल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य/ केंद्रशासित प्रदेशांनी त्यांची चाचण्या करण्याची क्षमता वाढविण्याच्या सूचना नियमितपणे दिल्या जात आहेत.
देशभरात covid-19 चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढत असल्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवण्यास मदत होत आहे. सरकारी क्षेत्रातल्या 865 प्रयोगशाळा आणि 358 खाजगी प्रयोगशाळा मिळून आता एकूण संख्या 1223 झाली आहे. चाचणीसाठी ठरवलेल्या सुवर्ण प्रमाणकाबरोबरच आधारित सरकारी व खाजगी तपासणी प्रयोगशाळा देशात जानेवारी 2020 मध्ये covid-19 साठी एकच प्रयोगशाळा उपलब्ध होती त्यांची संख्या मार्च 2020 मध्ये 121 झाली आणि आता 1223 पर्यंत झपाट्याने वाढली आहे गेल्या चोवीस तासात तीन लाख 20 हजार 161 नमुन्यांची तपासणी झाली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या एक कोटी 24 लाख 12664 इतकी आहे व ती सतत वाढत आहे दर दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांची संख्या सतत वाढत असून ती आता 8994.7 वर पोहोचली आहे 14 जुलै 2020 रोजी एका दिवसात 3.2 लाख चाचण्या करण्यात आल्या covid-19 संबंधी अधिकृत तसेच अद्ययावत तांत्रिक माहिती साठी तसेच मार्गदर्शक सूचनांसाठी पुढील संकेतस्थळाला नियमित भेट द्या. https://www.mohfw.gov.in/ and @MoHFW_INDIA
covid-19 संबंधी तांत्रीक शंका निरसनासाठी technicalquery.covid19[at]gov[dot]in व ncov2019[at]gov[dot]in संकेतस्थळाला नियमित भेट द्या.
प्रश्न covid-19 संबंधातल्या शंका निरसनासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या +911123978040 या क्रमांकावर दूरध्वनी करा.
निशुल्क राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकासाठी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf
* * *
B.Gokhale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638790)
Visitor Counter : 227
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam