कृषी मंत्रालय
राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, हरियाणा आणि बिहार या राज्यांमध्ये मिळून एकंदर 3 लाख हेक्टर क्षेत्रफळाच्या प्रदेशात टोळधाड नियंत्रण मोहीम राबवण्यात आली
टोळधाड नियंत्रण मोहीम 12 ते 13 जुलै दरम्यान राजस्थानमधील आठ जिल्ह्यातील 26 ठिकाणी, उत्तरप्रदेशातील सीतापुर आणि गोंडा जिल्हे तर हरियाणातील महेंद्रगड आणि भिवानी आदी ठिकाणी राबवण्यात आली
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2020 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2020
टोळधाड नियंत्रण मोहीम 11 एप्रिल 2020 ला सुरू झाली. 12 जुलै 2020 पर्यंत राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांमध्ये 1,60,658 हेक्टर क्षेत्रफळावर टोळधाड नियंत्रण कक्षातर्फे तर राज्य सरकारांतर्फे राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड हरियाणा आणि बिहार येथे 1,36,781 हेक्टर क्षेत्रावर ही मोहीम राबवली गेली.
12 आणि 13 जुलै 2020 दरम्यानच्या मध्यरात्रीपासून राजस्थान मधील बारमर, जैसलमेर,जोधपूर, बिकानेर, श्रीनगर, चुरू, झुनझुनू आणि अलवार या जिल्ह्यांमधील सव्वीस ठिकाणी तर उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील एका ठिकाणी तसेच हरियाणातील महेन्द्रगड आणि भिवानी जिल्ह्यातील दोन ठिकाणी ही मोहिम सुरू झाली. याशिवाय संबधित राज्यांच्या कृषी विभागानेही वेगवेगळ्या ठिकाणी टोळधाड नियंत्रण मोहीम राबवली. यामध्ये उत्तर प्रदेशातील सीतापुर आणि गोंडा या जिल्ह्यातील दोन ठिकाणी 12 आणि 13 जुलैला मध्यरात्री छोटे थवे तसेच विरळ असलेल्या टोळधाडीविरुद्ध ही मोहीम राबवण्यात आली.
सध्या 60 नियंत्रण दले औषध फवारणी करणाऱ्या वाहनांसह राजस्थान, गुजरात , मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कामगिरीवर तैनात करण्यात आली आहेत, तर 200 पेक्षा जास्त केंद्र सरकारी कर्मचारी या टोळधाड नियंत्रण मोहिमेत सहभागी आहेत. याशिवाय फवारणी करणारी 20 यंत्रे घेण्यात येऊन टोळधाड नियंत्रण कार्याला देण्यात आली आहेत. नियंत्रण कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी अजून पंचावन्न वाहने खरेदी करून ती टोळधाड नियंत्रण कार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. याखेरीज बारमर, जेसलमेर, बिकानेर, नागौरी आणि फालोदी या राजस्थानातील प्रदेशांमध्ये उंच झाडांवरील तसंच दुर्गम भागातील योग्य ठिकाणी टोळांवर परिणामकारक नियंत्रण मिळवण्यासाठी औषधे फवारणी करता यावी म्हणून 5 कंपन्यांकडून 15 ड्रोन वापरण्यात येत आहेत. राजस्थानामधील राखीव वाळवंटी प्रदेशात आवश्यकतेनुसार वापरण्यासाठी बेल हेलिकॉप्टर सुद्धा तैनात आहे. भारतीय हवाईदलाने Mi-17 हेलिकॉप्टरचा वापर करत टोल विरोधी मोहिमेच्या चाचण्या केल्या.
गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार आणि हरियाणा या राज्यांमध्ये पिकांचे फारसे नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. राजस्थानातील काही जिल्ह्यात मात्र पिकांचे थोडेफार नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.
राजस्थानमधील बारमर, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, झुनझुनू, श्रीगंगानगर, अलवार आणि चारू या जिल्ह्यांत, तसेच हरियाणातील भिवानी आणि महेंद्रगड व उत्तर प्रदेशातील सीतापुर आणि गोंड या जिल्ह्यात गुलाबी छोट्या टोळांचे तसेच वाढलेल्या मोठ्या टोळांचे थवे सक्रिय होते .
- उत्तर प्रदेशातल्या गोंडा जिल्ह्यातील याकुबनगर तालुक्यातील कर्नेलगंज इथे सुरू असलेली नियंत्रण मोहीम.
- हरियाणातील रामगडअलवर येथे सुरू असलेली नियंत्रण मोहीम
- राजस्थानातील चिरावा येथे सुरू असलेली नियंत्रण मोहीम.
- राजस्थानातील कसानी इथे पडलेला मृत टोळांचा खच.
B.Gokhale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1638569)
आगंतुक पटल : 266