रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

रस्ते बांधणी आणि पुनर्वसन उपकरणे, तसेच जड वाहन यंत्रणांना नोंदणी/वाहन परवान्यासाठी आग्रह करु नये-केंद्रीय रस्ते मंत्रालयाची सर्व राज्यांना सूचना

Posted On: 13 JUL 2020 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जुलै 2020

रस्ते बांधणीसाठी लागणारी वाहनयंत्रणा म्हणजे मोटार वाहन नसते आणि त्याचा समावेश मोटार वाहन कायद्यात होत नाही, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या मशीन्सची नोंदणी आणि वाहन परवान्यासाठी आग्रह करु नये, अशी सूचना मंत्रालयाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात, मंत्रालयाने म्हटले आहे, की रस्ते बांधणी आणि पुनर्वसन कामांसाठी लागणाऱ्या उपकरणांबाबत मंत्रालयाला अनेक पत्रे आली आहेत. यात, 'कोल्ड रीसायालिंग मशीन्स' आणि जमीन स्थिर करणारी मशीन अशा रस्ते बांधणी, तसेच पुनर्वसन उपकरणांच्या मोटार वाहन कायदा-1989 अंतर्गत नोंदणीविषयीच्या चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत.

या निवेदनांनुसार, 'कोल्ड मिलिंग मशीन्स' डांबरी कोळशाचा वरचा स्तर फोडून तो बाजूला करण्यासाठी वापरल्या जातात. यातून जे अस्फाल्ट डांबर तयार होते, त्यांचा पुनर्वापर केला जाऊ शकतो, त्यामुळे मायनिंग आणि क्रशिंगचा खर्च वाचू शकतो. यातून मिळालेल्या बिटूमीनचा वापर करुन आपल्याला परदेशी चलनाचीही बचत करता येते.

तसेच, कंपनीकडून सवलतीत मिळालेले हे काम विशिष्ट साखळीच्या आतच आहे. त्यामुळेच, ही उपकरणे एका ठरविक प्रदेशातच काम करतात. त्याशिवाय, या उपकरणांचा वेग ताशी 5 ते 10 किलोमीटर एवढा असतो. ही उपकरणे ट्रेलरवरून कामाच्या स्थळी पोहचवली जातात. 

जड वाहन यंत्रणांकडून (HEMM) मिळालेल्या निवेदनातही या वाहनांच्या नोंदणीविषयीची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

ही जड वाहने, म्हणजे डंपर, पेलोड्स, शोव्हेल्स, ड्रील मास्टर, बुलडोझर, मोटर ग्रेडर आणि रॉक ब्रेकर. या सर्व उपकरणांना ऑफ द रोड म्हणजे रस्त्यावर न चालणारी असे समजले जाते. ही वाहने एकाच व्यवस्थापनाखाली, खाण परिसराच्या सीमेअंतर्गत वापरली जातात आणि त्यांच्यावर खाण व्यवस्थापकाचे पूर्ण नियंत्रण असते; तसेच या सीमेबाहेर ती कधीही चालवली जात नाहीत.

मंत्रालयाच्या संपर्क विभागाने, मोटार वाहन कायद्यातील कलम 2(28) कडे लक्ष वेधले आहे, यात, मोटार वाहनाची सविस्तर व्याख्या दिलेली आहे. याच कायद्यातील कलम 3(1) नुसार, वाहन परवान्यांसाठीची अनिवार्यता विशद करताना असे म्हटले आहे, की कोणीही व्यक्ती अधिकृत परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवू शकत नाही. तसेच कुठलीही व्यक्ती कोणतेही मालवाहतूक वाहन देखील परवान्याशिवाय चालवू शकत नाही.

CMVR-TSC च्या 56व्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती, ज्यावेळी असे मत मांडण्यात आले, की 'कोल्ड मिलिंग मशीन्स', 'कोल्ड रिसायकलर' आणि 'सॉईल स्टॅबीलायझर' या सगळ्यांचा समावेश मोटार वाहन कायद्याने स्पष्ट केलेल्या मोटार वाहनाच्या व्याख्येत होऊ शकत नाही आणि या मशीनला मंजुरी देण्याविषयीची निश्चित परिमाणे नाहीत.

त्याच धर्तीवर, HEMM सारखी जड वाहने, जसे डम्पर, पेलोड्स शोव्हेल्स, ड्रील मास्टर, बुलडोझर मोटार ग्रेडर यांचाही समावेश मोटार वाहनांच्या व्याख्येत केला जाऊ शकत नाही. त्यामुळेच या उपकरणांची नोंदणी मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत करावी, असा आग्रह धरला जाऊ शकत नाही.

 

S.Pophale/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638495) Visitor Counter : 223