ऊर्जा मंत्रालय

राष्ट्रीय जलविद्युत निगमने (NHPC) आयोजित केले रक्तदान शिबीर

Posted On: 13 JUL 2020 7:01PM by PIB Mumbai

 

ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील, प्रथम श्रेणीची जलविद्युत कंपनी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मिनि रत्न- I या प्रकारातील, जलविद्युत कंपनी, एनएचपीसी (NHPC Limited) म्हणजे राष्ट्रीय जलविद्युत निगम यांनी फरीदाबाद येथील 'रोटरी क्लब ऑफ फरिदाबाद मिडटाऊन' यांच्या सहकार्याने 12 जुलै 2020 रोजी 'एनएचपीसी'च्या रहिवासी वसाहतीत रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

'एनएचपीसी'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. के. सिंग आणि त्यांची पत्नी सुधा सिंग यांनी, 'एनएचपीसी'चे संचालक एन. के. जैन आणि  'एनएचपीसी'चे वरीष्ठ अधिकारी तसेच रोटरी क्लबचे सदस्य, यांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ए. के. सिंग म्हणाले, कोविड-19च्या अभूतपूर्व संकटाने जगाला ग्रासले असून, रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे आणि म्हणूनच रक्तपेढ्यांना मदत करण्यासाठी 'एनएचपीसी'ने हे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या उपक्रमाची प्रशंसा करत, त्यांनी 'एनएचपीसी'च्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या चांगल्या कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन  यावेळी केले. या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला आणि एकूण 75 युनिट्स (बाटल्या) रक्त जमा झाले.

या प्रसंगी 'रोटरी क्लब ऑफ फरिदाबाद मिडटाऊन'चे अध्यक्ष पंकज गर्ग, सचिव डॉ. आशिष वर्मा आणि कोषाध्यक्ष सचिन खोसला यांनी 'एनएचपीसी'ने या उपक्रमात पुढाकार घेऊन, या शिबिराची व्यवस्था करून, हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल 'एनएचपीसी'चे आभार मानले.

देशभरातील 'एनएचपीसी'च्या कार्यालयांनी, कोविड-19चा प्रतिबंध करण्यासाठी, पीपीई कीट्स, मास्क, जंतुनाशक द्रव्ये यांचे वाटप, निर्जंतुकीकरण अभियान, विलगीकरणाच्या सुविधा, रुग्णांची जलद ने-आण करणाऱ्या गाड्या, अतिदक्षता कक्षासाठी पोर्टेबल व्हेंटिलेटर, आपत्कालीन स्थितीनंतर रूग्णांना पूर्वपदावर आणण्यासाठी लागणाऱ्या  ट्रॉली, रक्तचाचण्यांची सोय, अल्ट्रा साऊंड मशिन्स, ॲनेस्थेशिया देण्यासाठी लागणारी उपकरणे, अशा अनेक प्रकारांनी मदत केली आहे. एनएचपीसीच्या, समर्पित डॉक्टरांच्या पथकांनी, या महामारीच्या काळात त्यांच्या अखत्यारीतील रुग्णालय प्रकल्प आणि दवाखान्यांतून 24×7 वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे.

*****

S.Pophale/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638456) Visitor Counter : 119