निती आयोग

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अटल ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल केले सुरू

शालेय विद्यार्थ्यांना ॲप वापरकर्त्यांबरोबरच नाविन्यपूर्ण ॲप निर्माते बनविण्याचे उद्दीष्ट

Posted On: 11 JUL 2020 10:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या आवाहनाच्या अनुषंगाने भारतीय मोबाइल ॲप नाविन्यपूर्ण पद्धतीने विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने (एआयएम) आज देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी 'अटल ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल’ सुरू केले.

अटल इनोव्हेशन मिशनच्या महत्वाकांक्षी अटल टिंकरींग लॅब उपक्रमांतर्गत भविष्यात शालेय विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढविण्याबरोबरच त्यांना ॲप वापरकर्त्यांकडून ॲप निर्माते बनविण्याचे उद्दीष्ट ठेवून भारतीय स्टार्टअप प्लेझ्मोच्या सहकार्याने अटल ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल सुरू करण्यात आले आहे.

या मॉड्यूलवर आपले मत व्यक्त करताना नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले की कोविड -19 महामारीने निर्माण झालेल्या अडथळ्यांचा सामना दररोजच्या जीवनात करताना तंत्रज्ञानाचा वापराची मोठी मदत होत आहे.

ते म्हणाले, "आमचे आदरणीय पंतप्रधान नागरिकांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी नवोन्मेष करण्यास प्रोत्साहन देत आहेत. तरुण भारतीयांना तरुण वयात कौशल्ये आत्मसात करून पुढच्या पिढीचे तंत्रज्ञान मार्गदर्शक होणे महत्वाचे आहे. भारतातील आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी अटल इनोव्हेशन मिशनच्या महत्वाकांक्षी अटल टिंकरींग लॅब उपक्रमांतर्गत अटल डेव्हलपमेंट मॉड्यूल सुरू केल्याचा नीती आयोगाला अभिमान आहे.

अटल ॲप डेव्हलपमेंट मॉड्यूल हा एक ऑनलाईन अभ्यासक्रम असून पूर्णपणे मोफत आहे. 6 प्रकल्प-आधारित शैक्षणिक मॉड्यूल्स आणि ऑनलाईन मार्गदर्शक सत्राद्वारे तरुण नवनिर्माते विविध भारतीय भाषांमध्ये मोबाइल अॅप्स तयार करण्यास शिकू शकतात आणि त्यांचे कौशल्य दाखवू शकतात. याव्यतिरिक्त, शालेय शिक्षकांमध्ये ॲप विकासासाठी क्षमता आणि कौशल्य तयार करण्यासाठी, अटल इनोव्हेशन मिशनच्या ॲप डेव्हलपमेंट अभ्यासक्रमात ठराविक कालांतराने शिक्षक प्रशिक्षण सत्र आयोजित केले जातील.

मॉड्यूलच्या आभासी प्रक्षेपणप्रसंगी बोलताना नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक आर रामानन म्हणाले, आम्हाला आपल्या देशातील प्रचंड लोकसंख्याशास्त्रीय लाभांश मिळवून देण्यासाठी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान उपाय आणि भारतातील ॲप्सची आवश्यकता आहे. आत्मनिर्भर भारत ॲप नवोन्मेष आव्हानाची सुरुवात युवा विद्यार्थ्यांना शाळा, विद्यापीठ आणि उद्योग पातळीवर एकसमान प्रेरणा देणारी आहे. नीती आयोगाचे अटल इनोव्हेशन मिशन आता ॲप डेव्हलपमेंटची कौशल्ये देशभरातील अटल टिंकरिंग लॅबच्या तरुण नवनिर्मात्यांमध्ये विकसित करीत आहे जेणेकरुन त्यांच्या टिंकरिंग लॅबच्या नाविन्यपूर्ण गोष्टींचा उपयोग मोबाईल अ‍ॅप्सद्वारे करता येईल आणि त्यांच्या नाविन्यपूर्णतेचा वापर वाढेल. कोणत्याही देशातील शालेय स्तरावरील शिक्षण आणि विकास उपक्रमांपैकी हा सर्वात मोठा ॲप असेल.

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकर मोहिमेचा एक भाग म्हणून, देशभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांची सर्जनशीलता वाढविण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेसह गेम डिझाईन अँड डेव्हलपमेंट, थ्रीडी डिझाईन, खगोलशास्त्र, डिजिटल क्रिएटिव्हिटी कौशल्य इत्यादी तंत्रज्ञानाचे नाविन्यपूर्ण आयाम शिकण्यासाठी आणि त्याच्या वापरासाठी घरबसल्या सुरक्षित असे हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत भारतीय स्टार्टअप प्लेझ्मोच्या सहकार्याने अटल अ‍ॅप डेव्हलपमेंट मॉड्यूल सुरू करण्यात आल्याचा  आहे. आशा आहे की सर्व मुले आणि शिक्षक  # मेकइनइंडिया या मॉड्यूलचा उपयोग करतील आणि भविष्यात तंत्रज्ञान प्रणेते तसेच आणि आपल्या देशाचे नवनिर्माते होतील.

प्लेझ्मोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पळशीकर म्हणाले, कृषी आणि औद्योगिक क्रांतीनंतर आता तंत्रज्ञानातील क्रांतीने जागतिक अर्थव्यवसंस्थेला आकार प्राप्त होत आहे.  21 व्या शतकातील तंत्रज्ञान कौशल्य जसे कि कोडींग, संगणकीय विचारसरणी, डिझाईन विचार आणि समस्या सोडवणे यासारख्या गोष्टी शिकण्यास प्रत्येकाला सक्षम बनविणे हे प्लेझ्मोचे ध्येय आहे. हा उपक्रम आमच्या तरुण पिढीला भारताला जागतिक तंत्रज्ञान महासत्ता बनविण्यास सक्षम बनवेल आणि # आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनात योगदान देईल.

आतापर्यंत अटल इनोव्हेशन मिशनद्वारे देशभरातील 660 हून अधिक जिल्ह्यांमध्ये 5100 पेक्षा अधिक अटल सुरू आहेत आणि दोन दशलक्षाहूनही अधिक विद्यार्थ्यांना टिंकरिंग लॅबमध्ये प्रवेश आहे. देशातील सामाजिक आर्थिक वाढीस सक्षम करणारी  उत्पादने आणि सेवा नाविन्यपूर्ण आव्हाने यासह इनक्यूबेटर, स्टार्टअप्स, कम्युनिटी इनोव्हेटर सेंटर आणि अटल न्यू इंडिया आव्हानांचा समावेश असलेल्या विविध समाकलित पुढाकारांच्या माध्यमातून देशभरात सर्जनशीलता आणि नवकल्पना वाढविण्याचा दृष्टिकोन यात आहे.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1638096) Visitor Counter : 179