आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची ताजी स्थिती
कोविड-19 च्या वैद्यकीय व्यवस्थापन धोरणासाठीची प्रमाणित उपचार मानके
Posted On:
11 JUL 2020 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2020
कोविड-19 च्या उपचाराबाबतचा दृष्टीकोन बऱ्याच प्रमाणात लक्षणविरहित-(asymptomatic) आणि तब्येत उत्तम राखण्यासाठीच्या पूरक उपाययोजना यावर आधारित आहे, कारण अद्याप आपल्याला त्यावर काहीही औषध मिळालेले नाही.
मात्र, अशावेळी शरीरातील पाण्याचे प्रमाण आवश्यक तेवढे राखणेही आवश्यक असते.लक्षणांच्या गांभीर्यानुसार कोविड-19 ची तीन गटात विभागणी केली जाऊ शकते-: सौम्य, मध्यम आणि तीव्र. राज्यांसोबत 10 जुलै 2020 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये आणि “राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्ण उत्कृष्टता केंद्रे” याबाबत झालेल्या आभासी बैठकीत, ICMR आणि AIIMS नवी दिल्ली, या दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी आग्रहीपणे सांगितले की, जेव्हा आपल्याकडे या आजारावर औषध उपलब्ध नाही, तेव्हा सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या रूग्णांची काळजी घेणाऱ्या प्रमाणित पूरक उपचारांची पद्धती, जी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉल मध्ये सांगितलेली आहे, तीच पद्धती पाळली जाणे अत्यंत महत्वाचे आहे.
मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या रुग्णांसाठी,पुरेसा ऑक्सिजन पुरवठा, रक्त-घट्ट करणाऱ्या अँटीकोऍग्यूलंट आणि कॉर्टिकोस्टीरॉइड्स या औषधांचे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी प्रोटोकॉलनुसार दिलेले डोज, हे सर्व कोविड-19 च्या उपचाराबाबतचा महत्वाचा आधार समजला जाऊ शकतो. सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये, एकूण रूग्णांपैकी, 80 टक्के रूग्णांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन दिले जाते. या रूग्णांसाठीच्या प्रमाणित उपचार धोरणांचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहेत.
कोविड-19 वर प्रभावी उपचारांचा पाठपुरावा करतांना,काही अशी औषधे, जी मुख्य वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉलचा भाग नव्हती,मात्र, “संशोधनात्मक उपचारांचा’ भाग असू शकतात, असे निर्देशित झाले होते, अशा औषधांचाही वापर केला जाऊ शकतो हे ही निष्पन्न झाले.ही औषधे, रुग्णांच्या उपगटानुसार दिली जाऊ शकतात, मात्र त्यासाठी संबंधित रूग्णांना त्या औषधाची माहिती द्यावी लागेल. भारतीय औषध नियंत्रक महासंचालनालय (DCGI) ने या औषधांच्या वापराला अद्याप परवानगी दिली नसून, केवळ कोविड-19 च्या आप्तकालीन परिस्थितीतच त्यांचा वापर करण्यास परवानगी आहे.
राज्ये तसेच उत्कृष्टता केंद्र म्हणून मान्यता मिळालेली वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांनाही ICMR आणि AIIMS ने पुन्हा एकदा सांगितले आहे की औषधांचा सरसकट वापर किंवा जिथे त्यांची गरज नसेल, अशा ठिकाणी त्यांचा वापर करण्यामुळे तब्येतीवर चांगला परिणाम होण्याऐवजी विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
रेमडेसीवीर या औषधाच्या उपलब्ध पुराव्यानुसार, हे औषध जर मध्यम किंवा तीव्र लक्षणे असलेल्या रूग्णांना दिले गेले, तर त्यांच्या वैद्यकीय उपचारांमध्ये लवकर सुधारणा होऊ शकते. मात्र, कोविड मृत्यूदर कमी करण्यात ते लाभदायक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या औषधाचे यकृत आणि किडनीवर होणारे गंभीर विपरीत परिणाम लक्षात घेऊन, त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करायला हवा. त्याचप्रमाणे, टोसीलीजुमाब औषधाच्या अध्ययनात असे आढळले आहे की त्याचाही मृत्यूदर कमी करण्यात काहीही उपयोग होत नाही. मात्र,जर तीव्र लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी त्याचा वापर करायचा झाल्यास, त्यासाठी रूग्णाला त्याची पूर्ण कल्पना देऊन त्याची संमती घेणे आवश्यक आहे. या औषधांचा परिणाम अत्यंत गंभीर म्हणजे, “सायकोटाइन स्टोर्म” स्वरूपाचा असल्यामुळे त्यांचा मनमानी वापर होऊ द्यायला नको.
या सर्व “संशोधनात्मक उपचारपद्धती” योग्य प्रकारच्या आरोग्य सुविधा असलेल्या ठिकाणी, जिथे, रूग्णांवर योग्य लक्ष ठेवणे शक्य असेल, तिथेच करुन बघायला जाव्यात,जेणेकरुन त्यांचे काही विपरीत परिणाम झाल्यास, त्यावर त्वरित उपचार करता येतील. ICMR ने शिफारस केली आहे आहे की वैद्यकीय व्यवस्थापनाचा भर, ऑक्सिजन थेरेपी (यात नाकाद्वारे ऑक्सिजन देणे), स्टेरॉइड, टीकोऍग्यूलंट आणि इतर पूरक उपचारांचा योग्य प्रमाणात वापर, त्यासोबतच, रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांना मानसिक समुपदेशन, आधी असलेल्या आजारांवर उपचार, या सर्व बाबींवर भर दिला जावा.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638061)
Visitor Counter : 442