रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेच्या मूल्यांकनासाठी मानदंड निश्चित करण्यासाठी मते-टिप्पणी आमंत्रित

Posted On: 11 JUL 2020 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2020

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या वाहनांच्या सुरक्षितेतच्या मूल्यांकनासाठी मानदंड निश्चित करण्यासाठी, प्रमाणिकरणाविषयी संबंधितांनी मते- टिप्पणी नोंदवावीत, असे आवाहन केले आहे. याविषयी मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मध्ये प्रस्तावित सुधारणा करण्यासाठी जीएसआर 436 (ई) अनुसार दि. 10 जुलै, 2020 रोजी अधिसूचना जारी केली आहे.

भारतीय मानक ब्यूरो कायदा,2016 (11 ऑफ 2016) अंतर्गत वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार ‘कंम्प्रेस्ड गॅस्यूस हायड्रोजन फ्यूएल सेल’वर चालणाऱ्या एम आणि एन श्रेणीतल्या मोटर वाहनांचा समावेश एआयएस 157:2020 अनुसार करण्याचा प्रस्ताव आहे. जोपर्यंत भारतीय मानक ब्यूरो कायदा,2016 अधिनियम (11 ऑफ1986) विषयी कोणतीही सूचना जारी केली जात नाही, तोपर्यंत इंधन सेल वाहनांचा तपशील ‘आयएसओ 14687’ अनुसार नोंदवण्यात येणार आहे.

वाहतूक मंत्रालयाने प्रस्तावित दुरूस्तीविषयी सर्वसामान्य नागरिक तसेच या क्षेत्रातले सर्व भागधारक, वाहन उद्योगाशी संबंधित, यांनी आपली मते, सूचना आणि टिप्पण्या पाठवाव्यात असे आवाहन केले आहे. इच्छुकांनी सह-सचिव (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद पथ, नवी दिल्ली- 100001) या पत्त्यावर अथवा (email: jspb-morth[at]gov[dot]in) या ई-मेलवर आपल्या सूचना दि. 9 ऑगस्ट,2020 पर्यंत पाठवाव्यात.

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638038) Visitor Counter : 230