कृषी मंत्रालय
खरीप पिकांमध्ये डाळींच्या लागवडीखालच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.5 पटींनी वाढ; तेलबियांच्या लागवडीखालच्या क्षेत्रातही वाढ
भात, भरड तृणधान्ये आणि कपाशीच्या लागवडीतही वाढ
Posted On:
10 JUL 2020 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2020
कृषी, सहकारी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार हे कोविड-19 महामारी दरम्यान शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी,शेतीसंबधीत अनेक लाभदायक उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे.
खरीप पिकांच्या लागवडीखाली येणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रफळातसमाधानकारक वाढ झाली आहे. त्याची माहिती खालील प्रमाणे:
उन्हाळी पिकांच्या लागवडीखाली येणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ
भात: यावर्षी 120.77 लाख हेक्टर क्षेत्रफळ उन्हाळी भाताच्या लागवडीखाली आणले आहे. गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 95.73 लाख हेक्टर एवढे होते.
डाळी: यावर्षी 64.25 लाख हेक्टर क्षेत्रफळ डाळींच्या लागवडीखाली आणले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 24.49 लाख हेक्टर एवढे होते.
भरड तृणधान्ये: यावर्षी 93.24 लाख हेक्टर क्षेत्रफळ भरड तृणधान्यांच्या लागवडीखाली आणले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 71.96 लाख हेक्टर एवढे होते.
तेलबिया: यावर्षी 139.37 लाख हेक्टर क्षेत्रफळ तेलबियांच्यालागवडीखाली आणले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 75.27 लाख हेक्टर एवढे होते.
उस : यावर्षी 50.89 लाख हेक्टर क्षेत्रफळ उसाच्यालागवडीखाली आणले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 50.59 लाख हेक्टर एवढे होते.
ताग आणि अंबाडी : यावर्षी 6.87 लाख हेक्टर क्षेत्रफळ ताग आणि अंबाडी लागवडीखाली आणले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 6.82 लाख हेक्टर एवढे होते.
कपास : यावर्षी 104.82 लाख हेक्टर क्षेत्रफळ कपाशीच्या लागवडीखाली आणले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 77.71 लाख हेक्टर एवढे होते.
लागवडीखालील क्षेत्रफळाची सविस्तर माहिती
U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1637936)
Visitor Counter : 288