राष्ट्रपती कार्यालय

तीन राष्ट्रांच्या राजदूतांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे सादर केली ओळखपत्र

Posted On: 08 JUL 2020 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जुलै 2020

 

भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज न्यूझीलंड, युनायटेड किंगडम आणि उझबेकिस्तान या तीन देशांच्या दूतांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ओळखप्रमाणपत्रांचा स्वीकार केला. अशा प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राजदूतांचे ओळखपत्र स्वीकारण्याची घटना राष्ट्रपती भवनामध्ये दुसऱ्यांदा घडली आहे. कोविड-19 महामारीचा काळ लक्षात घेवून ही व्यवस्था करण्यात आली. आज ज्या ‘मिशन’ प्रमुखांनीओळखपत्रे राष्ट्रपतींना सादर केलीत्या राजदूतांची माहिती पुढील प्रमाणे आहे:-

1.न्यूझीलंडचे उच्चायुक्त - डेव्हिड पाइन

2.युनायटेड किंगडमचे उच्चायुक्त - सर फिलीप बार्टन

3.उझबेकिस्तान प्रजासत्ताकचे राजदूत - अखातोव्ह दिलशॉद खामिदोविच

या नवनियुक्त राजदूत आणि उच्चायुक्तांना राष्ट्रपती कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या. भारताचे या तिन्ही देशांबरोबर अतिशय दृढ संबंध असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच वैश्विक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सामान्य दृष्टिकोनातून सामुहिक प्रयत्न करण्याचा उद्देशही सर्वांचा समान असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-19 महामारीचा प्रभावी सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्य वाढविणे, ही काळाची नितांत गरज असल्याचे राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. या संदर्भात ते म्हणाले, देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये पसरलेल्या या महामारीच्या विरोधात सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये भारत आघाडीवर आहे. या तीनही देशांबरोबर भारताचे अतिशय चांगले ऋणानुबंध निर्माण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 2021-22 या कार्यकाळासाठी भारत जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

 

 

S.Thakur/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637430) Visitor Counter : 148