अर्थ मंत्रालय

केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळेचे संवर्धन आणि ‘संपर्काशिवाय सीमाशुल्क सुविधे’चा आरंभ

Posted On: 07 JUL 2020 8:07PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष एम. अजित कुमार यांनी केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळा (सीआरसीएल) मध्ये समावेश केलेल्या अनेक नव्या आणि आधुनिक चाचणी उपकरणांचे काल अनावरण केले. ज्यामुळे सीमा शुल्क विभागाची अंतर्गत परीक्षण क्षमता वृद्धिंगत होऊन आयात आणि निर्यात मंजुरी वाढेल. त्यांनी सीबीआयसीची प्रमुख योजना ‘तुरंत कस्‍टम्‍स’ अंतर्गत संपर्काशिवाय सीमाशुल्क सुविधेत (‘कॉन्टेक्टलेस कस्टम्स’) आवश्यक सहकार्य देण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानविषयक अभिनव सुविधांचाही शुभारंभ केला.  

अजित कुमार यांच्या हस्ते याप्रसंगी एका माहितीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले, ज्यात सीआरसीएलच्या उपकरणांसंबंधी आणि परीक्षण सुविधांविषयी माहिती देण्यात आली आहे. या अत्याधुनिक सुविधांसाठी सुमारे 80 कोटी रुपये खर्च आला आहे. नवी दिल्ली, कांडला, बडोदा, मुंबई, न्हावा शेवा, कोचीन, चेन्नई आणि विशाखापट्टणम स्थित केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळांना चाचणी आणि संशोधनासाठी नॅशनल अ‍ॅक्रीडेटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिबरेशन लॅबरॉटरीजची मान्यता मिळाली आहे. याव्यतिरिक्त नवी दिल्ली आणि चेन्नईस्थित सीआरसीएल प्रयोगशाळांमध्ये न्यायवैद्यक चाचणी (एनडीपीएस पदार्थांची) करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. 

संपर्काशिवाय सीमाशुल्क (कॉन्टॅक्टलेस कस्टम्स) सुविधेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या माहिती-तंत्रज्ञान सेवांमध्ये निर्यातदार ‘आईसगेट’ च्या माध्यमातून आपले बँक खाते आणि अधिकृत विक्रेता कोड (एडी कोड) संबंधी स्वतःच व्यवस्थापन करु शकेल आणि याबरोबरच सीमा शुल्क अधिकाऱ्याशी संपर्काशिवाय ‘आईसगेटवर’ नोंदणीसुद्धा करु शकतील. आज जाहीर करण्यात आलेल्या आणखी एका सुविधेअंतर्गत इंडियन कस्टम्स ईडीआय सिस्टम (ICES) बॉण्डमध्ये स्वयंचलन पद्धतीने किंवा स्वतः डेबिट करता येईल ज्यामुळे आयातदाराला यापुढे कस्टम हाऊसकडे जाण्याची आवश्यकता पडणार नाही. आणखी एक निर्णय म्हणजे बॉण्डमधील शिल्लक रक्कम यापुढे आयात दस्तावेजात दर्शवली जाईल, ज्यामुळे आयातदारांना आपल्या आयातीविषयी नियोजन करण्यास मदत होईल. अध्यक्षांनी या नव्या सुविधांविषयी माहिती देताना सांगितले की, या सुविधांमुळे आता सीमा शुल्क अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याची आवश्यकता अगदीच थोड्या प्रमाणात असेल. 

महत्वाचे म्हणजे, प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय मुल्यांकन (फेसलेस असेसमेंट) च्या पहिल्या टप्प्यात बेंगळुरु आणि चेन्नई विभागात स्थापन करण्यात आलेल्या सिंगल पॉईंट इंटरफेस सुविधांचे लाभ लक्षात घेऊन सीबीआयसी 15 सप्टेंबर 2020 पासून सर्व सीमाशुल्क कार्यालयांमध्ये ‘तुरंत सुविधा केंद्र (टीएसके)’ ची स्थापना करणार आहे. ज्या-ज्यावेळी सीमाशुल्क कोणतेही दस्तावेज जसे ‘उत्‍पादनाच्या मूळ देशासंबंधीचे प्रमाणपत्र’ यात गडबड आढळून आल्यास दस्तावेजांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यास सांगितेल जाईल, अशा परिस्थितीत ‘टीएसके’ एकमात्र संपर्ककेंद्र असेल. यामुळे सीमाशुल्क मंजूरी प्रक्रिया अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.    

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1637059) Visitor Counter : 256