गृह मंत्रालय
विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थाना परीक्षा घेण्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी
Posted On:
06 JUL 2020 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2020
केंद्रीय गृह मंत्रालयाने, आज केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना पाठवलेल्या पत्रात, विद्यापिठे आणि शैक्षणिक संस्थाना, परीक्षा घ्यायला परवानगी दिली आहे. यूजीसीच्या परीक्षा व शैक्षणिक वेळापत्रकाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंजूर केलेल्या मानक प्रचालन प्रक्रीये (एसओपी) नुसार विद्यापीठांसाठी अंतिम सत्र परीक्षा घेणे अनिवार्य आहे.
* * *
S.Pophale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636912)
Visitor Counter : 317