अर्थ मंत्रालय
सॉव्हरिन सुवर्ण रोखे योजना 2020-21 (मालिका IV) – निर्गम किंमत
Posted On:
04 JUL 2020 3:32PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या अधिसूचना क्रमांक एफ. क्रमांक 4 (4) -बी / (डब्ल्यू अँड एम) / 2020 दिनांक 13 एप्रिल 2020 रोजी सॉव्हरिन सुवर्ण रोखे योजना 2020-21 (मालिका IV) ची विक्री 6 ते 10 जुलै 2020 पर्यंत खुली असेल आणि हिशेबाची तारीख 14 जुलै 2020 आहे. रिझर्व्ह बँकेने 03 जुलै 2020 रोजी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार खरेदी कालावधीत रोख्याची किंमत प्रति ग्रॅम 4,852 रुपये असेल.
रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार भारत सरकारने ऑनलाईन अर्ज करून डिजिटल पद्धतीने पैसे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना निर्गम किंमतीवर प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या रोख्यांची निर्गम किंमत प्रति ग्रॅम 4,802 रुपये असेल.
***
M.Jaitly/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636403)
Visitor Counter : 231