सांस्कृतिक मंत्रालय

राष्ट्रपती राम नाथ कोविंद 4 जुलै 2020 रोजी आषाढ पौर्णिमेनिमित्त धम्म चक्र दिन सोहळ्याचे उद्‌घाटन करणार


संस्कृती मंत्री प्रह्लादसिंग पटेल आणि अल्पसंख्यांक व्यवहार राज्यमंत्री किरेन रिजिजू देखील उद्‌घाटन सोहळ्याला संबोधित करणार

Posted On: 02 JUL 2020 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

7- 16 मे 2020 दरम्यान आभासी वेसक आणि जागतिक प्रार्थना सप्ताहाच्या यशस्वी आयोजनानंतर, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी), केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने आता  4 जुलै 2020 रोजी येणारी आषाढ पौर्णिमा धर्म चक्र दिन म्हणून साजरी करत आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचा  हा वार्षिक महत्वाकांक्षी कार्यक्रम असेल.

बुद्धांची आत्मज्ञान आणि  प्रबोधनाची भूमी म्हणून भारताचा ऐतिहासिक ठेवा, धम्मचक्र परिवर्तन आणि महापरिनिर्वाणच्या अनुषंगाने राष्ट्रपती  राम नाथ कोविंद, नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथून  धम्म चक्र दिन सोहळ्याचे उद्‌घाटन करतील.

द्‌घाटन सोहळ्याला सांस्कृतिक मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रह्लादसिंग पटेल आणि अल्पसंख्यांक व्यवहार राज्यमंत्री किरेन रिजिजू देखील संबोधित करतील. दिवसभरातील अन्य कार्यक्रम भारतीय महाबोधि सोसायटी आणि बोध गया मंदिर व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने मुलागंध कुटी विहार, सारनाथ आणि महाबोधि मंदिर, बोधगया येथून प्रसारित केले जातील.

राजघराण्यातील मान्यवर , बौद्ध संघांचे सर्वोच्च प्रमुख आणि जगभरातील तसेच आयबीसी सदस्य संस्थेचे प्रख्यात बुद्धिवंत यात सहभागी होत आहेत.

भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्याच्या पहिल्या पौर्णिमेच्या दिवशी येणारा आषाढ पौर्णिमेचा शुभ दिवस श्रीलंकेत एसाला पोया म्हणून आणि थायलंडमध्ये असंहा  बुचा म्हणूनही ओळखला जातो. बुद्ध पौर्णिमा किंवा वेसाक नंतर बौद्धांसाठी हा दुसरा पवित्र दिवस आहे.

 याच दिवशी  भारतात वाराणसी जवळच्या सारनाथ येथे सध्याच्या रिषिपतना ‘डियर पार्क’ येथे आषाढीच्या पौर्णिमेच्या दिवशी आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर  बुद्धांनी पहिल्या पाच संन्यासी शिष्याना पहिला उपदेश केला होता.  धम्म कक्क-पावततनसुत्त्ता (पाली) किंवा धर्मचक्र प्रवर्तन सूत्र (संस्कृत)चा उपदेश धम्मचक्र परिवर्तनाचे पहिले चाक म्हणून ओळखले जाते आणि यात चार महान सत्ये आणि उदात्त आठसूत्री मार्ग यांचा समावेश आहे.

भिक्षू आणि नन यांच्यासाठी  पावसाळी संमेलन  (वर्षा वसा) देखील जुलै ते ऑक्टोबर या काळात तीन चंद्र महिन्यांसाठी या दिवसापासून सुरू होतो आणि त्या काळात ते एकाच ठिकाणी साधारणपणे  गहन ध्यानधारणा  करण्यासाठी समर्पित त्यांच्या मंदिरांमध्ये राहतात. या काळात त्यांची सेवा समुदायाद्वारे केली जाते जे उपोसथा  म्हणजेच आठ आज्ञांचे पालन करतात आणि त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानधारणा  करतात.

हा दिवस बौद्ध आणि हिंदू गुरु पौर्णिमा म्हणून साजरा करतात.

आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी) ही अग्रगण्य बौद्ध विश्व संस्था म्हणून पुन्हा एकदा या अत्यंत पवित्र दिवसाच्या स्मरणार्थ भव्य उत्सव आयोजित  करून जगभरातील धम्म अनुयायांच्या सामूहिक आकांक्षेचे नेतृत्व करीत आहे.

 प्रचलित कोविड -19 महामारीमुळे हा  कार्यक्रम निकष आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करून आभासी तसेच बुद्धाच्या पाऊलखुणा असलेल्या पवित्र स्थानी आयोजित केला जात आहे. याशिवाय जगभरातील अनेक देशांमधून  थेरवडा आणि महायान परंपरेत धम्म कक्क पवतानसुत्त  जप तसेच समारंभाचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1636013) Visitor Counter : 238