रसायन आणि खते मंत्रालय

कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक काळातही ‘आरसीएफ’कडून शेतकरी बांधवांना खतांची  उपलब्धता सुनिश्चित


खरीप हंगामासाठी ‘आरसीएफ’च्यावतीने 2 लाख मेट्रिक टनापेक्षाही जास्त खते उपलब्ध

Posted On: 01 JUL 2020 6:54PM by PIB Mumbai

 

रसायन आणि खते मंत्रालय अंतर्गत, आरसीएफ म्हणजेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स देशातल्या शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक परिस्थितीतही आरसीएफने खरीप पेरण्यांची गरज लक्षात घेवून ‘उज्ज्वला’ यूरिया आणि ‘सुफला’ यासारख्या अव्वल खतांची उपलब्धता सुनिश्चित केली आहे.

आरसीएफ प्रकल्पामध्ये शारीरिक अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करून शेतकरी बांधवांना पेरणीच्यावेळी आवश्यक असलेल्या सर्व खतांचे पुरेसे उत्पादन करण्यात आले आहे. उत्पादित खतांशिवाय आरसीएफने डीएपी, एपीएस (20:20:0:13) आणि एनपीके (10:26:26) या खतांचा 2लाख मेट्रिक टन उत्पादन केले आहे. या खतांचा वापर सध्याच्या खरीप पेरण्यांसाठी देशातले शेतकरी करीत आहेत.

देशातल्या अव्वल 500 उत्पादकांची ‘फॉर्च्यून’ सूची दरवर्षी जाहीर केली जाते. यामध्ये आरसीएफच्या क्रमवारीमध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे. 2018 मध्ये ‘फॉर्च्यून’ सूचीमध्ये आरसीएफ कंपनी 191व्या क्रमांकावर होती. तर 2019च्या ताज्या अहवालानुसार यामध्ये सुधारणा होवून आरसीएफ कंपनी 155व्या क्रमांकावर आली आहे.

आरसीएफच्या कर्मचारी वर्गाने अतिशय अवघड परिस्थितीत जे परिश्रम केले, त्याचबरोबर खत विभागाकडून वेळोवेळी मिळत असलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन तसेच  सहकार्यामुळे कंपनीच्या कार्यामध्ये, क्रमवारीत सुधारणा होवू शकली आहे, असे आरसीएफचे मुख्य कार्यकारी संचालक एस.सी. मुदगेरीकर यांनी म्हटले आहे.

#RCF in its continuous endeavor to support India's Farming Sector has made available more than 2 lakh tons of imported fertilizers for the Kharif season.@PMOIndia @DVSadanandGowda @mansukhmandviya pic.twitter.com/tQIcFgx7Bv

— RCF (@rcfkisanmanch) June 30, 2020

***

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1635714) Visitor Counter : 236