गृह मंत्रालय

डॉक्टर दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी डॉक्टरांप्रती व्यक्त केले आभार व कृतज्ञता


या आव्हानात्मक काळात राष्ट्र सुरक्षित व आरोग्यपूर्ण ठेवण्याप्रती डॉक्टरांची निष्ठा अलौकिक असल्याचे केंद्रीय गृह मंत्र्यांचे प्रतिपादन

Posted On: 01 JUL 2020 4:57PM by PIB Mumbai

 

कोविड-19 विरोधातल्या लढ्यात आघाडीवर असणाऱ्या भारताच्या  डॉक्टरांचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आजच्या डॉक्टर दिनानिमित्त आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या आव्हानात्मक काळात राष्ट्र सुरक्षित व आरोग्यपूर्ण ठेवण्याप्रती डॉक्टरांची निष्ठा अलौकिक असल्याचे, केंद्रीय गृह मंत्र्यांनी ट्वीटर वर म्हटले आहे.

डॉक्टर दिनी, डॉक्टरांच्या निष्ठा व त्यागाला राष्ट्राचा सलाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मानवतेच्या सेवेसाठी निस्वार्थीपणाने अहोरात्र काम करत असलेल्या डॉक्टरांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार खंबीर उभे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशाच्या कोरोना योद्ध्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठीही त्यांनी प्रार्थना केली आहे.

कसोटीच्या या काळात डॉक्टरांना संपूर्ण सहकार्य व मानसिक आधार देणाऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबियांचेही शहा यांनी आभार मानले आहेत.

On Doctor’s Day, I salute our brave Doctors who have been leading the battle against COVID-19 at the forefront. Their uttermost commitment to keep the nation safe and healthy in these challenging times is truly exceptional. Nation salutes their devotion and sacrifice.

— Amit Shah (@AmitShah) July 1, 2020

*****

S.Pophale/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635670) Visitor Counter : 225