निती आयोग

कोविड-19 नंतर भारताची आर्थिक स्थिती सावरण्यात स्वच्छ ऊर्जा मदत करू शकते

Posted On: 30 JUN 2020 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2020


नवीन अहवालात कोविड 19 च्या संदर्भात स्वच्छ गतिशीलता आणि उर्जा प्रणालीकडे भारताच्या संक्रमणासाठी उद्भवणारी आव्हाने आणि संधी यावर प्रकाश टाकला आहे.

नीती  आयोग आणि रॉकी माउंटन संस्थेने (आरएमआय) आज 'स्वच्छ ऊर्जा अर्थव्यवस्थेच्या दिशेने : भारताच्या ऊर्जा आणि गतिशीलता क्षेत्रातील कोविड -19 नंतरच्या संधी' यावरील अहवाल सादर केला, ज्यात स्वच्छ, लवचिक आणि कमीतकमी खर्चात ऊर्जा निर्मितीच्या दिशेने होत असलेले प्रयत्न आणि प्रोत्साहन याचे समर्थन करण्यात आले आहे.  या प्रयत्नांमध्ये इलेक्ट्रिक वाहन, उर्जा साठवणूक आणि नवीकरणीय ऊर्जा कार्यक्रमांचा समावेश आहे.

या अहवालात कोविड-19 मुळे  भारतातील स्वच्छ उर्जा संक्रमणावर विशेषत: वाहतूक आणि उर्जा क्षेत्रावर  प्रभाव  पडायला कशी  सुरुवात झाली हे नमूद करण्यात आले आहे आणि देशातील नेत्यांना आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि स्वच्छ उर्जा अर्थव्यवस्थेच्या दिशेने गती कायम राखण्यासाठी तत्वे आणि धोरणात्मक संधींची शिफारस केली आहे.

कोविड-19 ने भारताच्या वाहतूक आणि वीज क्षेत्रासाठी तरलता मर्यादा आणि पुरवठा टंचाईपासून ग्राहकांच्या मागणी आणि प्राधान्य यामध्ये बदल यांसारखी मागणी-पुरवठा-बाजूची आव्हाने सादर केली आहेत.

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले की कोविड -19  महामारीचा प्रसार रोखून भारताची अर्थव्यवस्था सुधारेल याची मला खात्री आहे. “भारताच्या मजबूत लोकशाही संस्था धोरण स्थिरतेला चालना देतात. सध्या सुरु असलेल्या आर्थिक सुधारणांची जर चांगली अंमलबजावणी झाली तर देशाचा विकास दर उंचावेल "

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की, “स्वच्छ ऊर्जा ही भारताची आर्थिक स्थिती सावरण्यात आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेच्या बाबतीत प्रमुख वाहक असेल.”

या नवीन सामान्य परिस्थितीत देश आणि उद्योग यांच्या भरभराटीसाठी आपल्या देशांतर्गत संशोधन प्रणालीचा कसा वापर करता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आम्ही विशिष्ट कृती करण्याची शिफारस केली आहे ज्याद्वारे भारत आपल्या दोन आर्थिक महाशक्ती - परिवहन आणि उर्जा क्षेत्रांना पुनरुज्जीवित करू शकेल आणि मजबूत करु शकेल. "

भारताच्या स्वच्छ उर्जा भविष्यास समर्थन देण्याच्या कार्यक्रमांचा विचार करता धोरण  निर्माते आणि अन्य प्रमुख निर्णयकर्त्यांसाठी  या अहवालात चार तत्त्वे दिली आहेत : 1) कमी खर्चिक उर्जा उपायांमध्ये  गुंतवणूक करा, 2) लवचिक आणि सुरक्षित उर्जा प्रणालींना सहकार्य करा , 3) कार्यक्षमतेस आणि स्पर्धात्मकतेला प्राधान्य द्या आणि 4) सामाजिक आणि पर्यावरणीय समतेला प्रोत्साहन द्या

नीती आयोगाचे प्रधान सल्लागार आणि मिशन संचालक अनिल श्रीवास्तव म्हणाले, “अल्प-मध्यम आणि दीर्घ कालावधीत अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मोक्याच्या संधी  शोधण्याची गरज आहे ज्या महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचे स्वच्छ ऊर्जा संक्रमण संधींमध्ये रूपांतर  करू शकेल.”

परिवहन क्षेत्रातील संधींमध्ये सार्वजनिक वाहतूक सुरक्षित  करणे, बिगर-मोटराइज्ड वाहतुकीची पायाभूत सुविधा वाढवणे आणि विस्तारणे , घरून काम करण्याच्या माध्यमातून प्रवासाचे अंतर  कमी करणे, मालवाहतूक आणि प्रवासी विभागात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याच्या राष्ट्रीय धोरणाला पाठिंबा देणे आणि भारताला ऑटोमोटिव्ह वाहन निर्यात केंद्र  बनविणे यांचा समावेश आहे.

वीज क्षेत्रात, संधींमध्ये वीज वितरण व्यवसाय आणि त्याच्या परिचलनात  सुधारणा करणे, नवीकरणीय आणि  वितरित उर्जा संसाधने सक्षम करणे नवीकरणीय  ऊर्जा आणि उर्जा संग्रहण तंत्रज्ञानाची लवचिकता आणि स्थानिक उत्पादनास प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.

“अहवालातील तत्त्वे आणि संधी भारताच्या सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रमुखांना अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रोत्साहन आणि  पर्यायांचे मूल्यांकन आणि प्राधान्य कसे देता येईल ज्यामुळे भारतासाठी दीर्घावधी स्वच्छ उर्जा भविष्यात गुंतवणूक सुरु राहील याविषयी मार्गदर्शन करू शकतात,” असे आरएमआय इंडियाच्या संचालक अक्षिमा घाटे यांनी म्हटले आहे. 

रॉकी माउंटन संस्थेचे  वरिष्ठ संचालक क्ले स्ट्रॅन्जर म्हणाले, “कोविड-19 ने जग विस्कटून टाकले आहे  आणि प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम झाला आहे.” “भारत सावरण्याचा प्रयत्न करत आहे. स्वच्छ उर्जा आणि गतिशीलता प्रणाली उत्पादन , विजेची विश्वासार्हता वाढवून, महाग तेलाची आयात टाळून आणि हवा स्वच्छ करून अधिक लवचिक भारत बनवू शकतात .”

अहवालात असे म्हटले आहे की भारताचे परिवहन क्षेत्र एकत्रित कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाच्या 1.7 गीगाटॉन्सची बचत करू शकेल आणि सामायिक, इलेक्ट्रिक आणि प्रवाशांची गतिशीलता आणि किफायतशीर , स्वच्छ आणि स्वस्त मालवाहतुकीद्वारे  2030 पर्यंत सुमारे 600 दशलक्ष टन तेल इंधन मागणी टाळू शकेल.नवीकरणीय  उर्जा, उर्जा संचय, कार्यक्षमता आणि लवचिक निर्मिती आणि मागणी यांद्वारे ऊर्जा क्षेत्रातही महत्त्वपूर्ण बचत साध्य होऊ शकेल 


अहवाल पुढील लिंकवर पाहता येईल.

नीती आयोग : https://niti.gov.in/sites/default/files/2020-06/India_Green_Stimulus_Report_NITI_VF_June_29.pdf

रॉकी माउंटन संस्था :

https://rmi.org/insight/india-stimulus-strategy-recommendations-towards-a-clean-energy-economy/

आरएमआय इंडिया :

https://rmi-india.org/insight/india-stimulus-strategy-recommendations-towards-a-clean-energy-economy/


* * *. 

B.Gokhale/S.Kane/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635370) Visitor Counter : 238