गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली 21 जून रोजी झालेल्या बैठकीत दिल्लीमध्ये कोविड-19 संदर्भात घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांकडून आढावा बैठकीचे आयोजन


निर्णयांची सुलभरित्या आणि वेळेवर अंमलबजावणी होत आहे आणि दिल्लीसाठी कोविड-19 प्रतिसाद योजना अंतिम करण्यात आला होती अशी बैठकीत माहिती

दिल्लीमध्ये कोविड-19 चा फैलाव झालेल्या सर्व विभागांसहित प्रतिबंधित क्षेत्रांची फेररचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निर्धारित केलेल्या मुदतीनुसार 26 जूनपर्यंत पूर्ण होणार

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निर्देशांनुसार दिल्लीमधील सेरोलॉजिकल सर्वेक्षणावर चर्चा करण्यात आली, एनसीडीसी आणि दिल्ली सरकारकडून संयुक्तपणे राबवल्या जाणाऱ्या या सर्वेक्षणाची सुरुवात 27 जूनपासून होणार

Posted On: 26 JUN 2020 5:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जून 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली 21 जून रोजी झालेल्या बैठकीत दिल्लीमध्ये कोविड-19 संदर्भात घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहसचिवांनी 25 जून रोजी एका  आढावा बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के . पॉल, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांच्यासह दिल्ली मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव या बैठकीत सहभागी झाले होते.

 यापूर्वी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची सहजतेने आणि वेळेवर अंमलबजावणी होत असल्याची आणि दिल्लीसाठी कोविड-19 प्रतिसाद योजना अंतिम करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय गृह सचिवांनी घेतलेल्या आढावा बैठकीत देण्यात आली. कोविड-19 शी संबंधित कामांसाठी जिल्हा स्तरीय पथकांची देखील स्थापना करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये कोविड-19 चा फैलाव झालेल्या सर्व विभागांसहित प्रतिबंधित क्षेत्रांची फेररचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निर्धारित केलेल्या मुदतीनुसार 26 जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती देखील या बैठकीत देण्यात आली. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम 30 जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशांनुसार दिल्लीमधील सेरोलॉजिकल सर्वेक्षणावर चर्चा करण्यात आली, एनसीडीसी आणि दिल्ली सरकारकडून  हे सर्वेक्षण संयुक्तपणे करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाची सुरुवात 27 जूनपासून होणार आहे आणि या सर्वेक्षणाशी संबंधित असलेल्या पथकांचे प्रशिक्षण काल पूर्ण करण्यात आले.

लोकसंख्येच्या समूहांमध्ये भविष्यात कोविड-19 च्या फैलावाचा शोध घेण्यासाठी आरोग्य सेतू  ऍपचा महत्त्वाचे साधन म्हणून एकत्रित वापर करायला देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मान्यता दिली. या ऍपच्या एकत्रित वापरासंदर्भात एनसीडीसीच्या प्रशिक्षकांकडून दिल्ली सरकारच्या जिल्हा पथकांना काल प्रशिक्षण देण्यात आले.

 

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1634564) Visitor Counter : 205