नौवहन मंत्रालय

महामारीतही अर्थव्यवस्थेचे चक्र सुरु ठेवण्यात नाविकांच्या योगदानाची केंद्रीय मंत्री मांडवीय यांच्याकडून प्रशंसा


आंतरराष्ट्रीय नाविक दिन साजरा

Posted On: 25 JUN 2020 7:50PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय नाविक दिनानिमित्त राष्ट्रीय सागरी दिन समारंभ समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय प्रमुख पाहुणे म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. नाविक दिनाची या वर्षीची संकल्पना आहे ’नाविक हे महत्वाचे कामगार’. जगभरात पुरवठा साखळी राखण्यात नाविकांच्या योगदानाची दखल या संकल्पनेत घेण्यात आली असून जागतिक व्यापारापैकी 90% व्यापार समुद्रामार्गे होतो.

मांडवीय यांनी यावेळी ई-स्मरणिकेचे प्रकाशन केले आणि उपस्थिताना संबोधित केले. जहाज बांधणी महासंचालक, एससीआय, शिपिंग  कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एससीआयचे अधिकारी, तसेच नाविक यावेळी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय नाविक दिनानिमित्त मांडवीय यांनी नाविकांचे अभिनंदन केले. भारताचा विकास आणि अर्थव्यवस्थेत देशाच्या नाविकांचे योगदान महत्वपूर्ण असल्याची त्यांनी दखल घेतली. या आव्हानात्मक कामात नाविकांना पाठबळ देत असल्याबद्दल त्यांनी नाविकांच्या कुटुंबियांचेही आभार मानले. कोविड महामारीच्या काळात साईन इन आणि साइन ऑफ, टाळेबंदी काळातले व्यवहार यासारख्या व्यावसायिक आव्हानांची त्यांनी दखल घेतली. भारतीय नाविकांचे योगदान 2014 मधल्या 94,000 वरून  5 लाख करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले. यामुळे रोजगाराच्या अधिक संधी आणि भारतीय युवकांना उच्च वेतनाचे रोजगार निर्माण होतील. महामारीतही अर्थव्यवस्थेचे चक्र सुरु ठेवण्यात नाविकांच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

*****

S.Pophale/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1634322) Visitor Counter : 251