मंत्रिमंडळ
उत्तर प्रदेशातील कुशिनगर विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
Posted On:
24 JUN 2020 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उत्तर प्रदेशातील कुशिनगर विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कुशिनगर विमानतळ स्रावस्ती, कपिलवास्तू, लुंबिनी सारख्या (कुशिनगर देखील एक बौद्ध सांस्कृतिक स्थळ आहे) विविध बौद्ध सांस्कृतिक स्थळांच्या जवळ स्थित असून, आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित झाल्यानंतर या स्थळाशी संपर्क सुधारेल. त्यासोबतच प्रवासींचा प्रवास खर्च वाचविण्याचे पर्याय देईल. याद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटनास चालना मिळेल व त्या क्षेत्राची आर्थिक प्रगती साधता येईल.
कुशिनगर उत्तर प्रदेशचा उत्तर - पूर्व भाग असून गोरखपुर पासून केवळ 50 किलोमीटर दूर आहे. कुशिनगर एक महत्वाचे बौद्ध धर्मस्थळ आहे.
* * *
B.Gokhale/S.Pophale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634026)
Visitor Counter : 239
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada