संरक्षण मंत्रालय

ऑपरेशन समुद्र सेतू - आयएनएस ऐरावतने 198 भारतीय नागरिकांना मालदीववरून मायदेशी आणले

Posted On: 23 JUN 2020 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जून 2020

भारतीय नौदलाद्वारे ऑपरेशन समुद्र सेतू साठी तैनात आयएनएस ऐरावत 198 भारतीय नागरिकांना माले, मालदीववरून घेऊन आज 23 जून 2020 रोजी पहाटे तुतीकोरीन येथे पोहोचले. आतापर्यंत भारतीय नौदलाने मालदीवमधील 2386 भारतीय नागरिकांना भारतात परत आणले आहे.

मालदीवमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतीय नागरिकांचे नौकारोहण शक्य झाले. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जहाजात बसविण्यात आले. सागरी प्रवासादरम्यान कोविड सुरक्षा शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

मायदेशी आलेल्या नागरिकांना तुतीकोरीन मधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सहाय्य केले आणि जलद गतीने जहाजातून खाली उतरवणे, आरोग्य तपासणी आणि प्रवाशांचे इमिग्रेशन आणि वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती.

यासह, भारतीय नौदलाने सध्याच्या साथीच्या काळात मालदीव,श्रीलंका आणि इराण येथून भारतात आणलेल्या भारतीय नागरिकांची संख्या 3305 वर पोहोचली.

 

M.Iyengar/S.Mhatre/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1633780) Visitor Counter : 281