कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
कौशल्य भारत अभियानांतर्गत 96,000 पेक्षा जास्त लोकांना योग शिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि ओदिशा ही सर्वाधिक कुशल योग उमेदवार असलेली अव्वल 5 राज्ये आहेत
Posted On:
20 JUN 2020 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जून 2020
तणाव व्यवस्थापनासाठी आणि सर्वांगीण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगसाधनेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाने (एमएसडीई) शुक्रवारी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते. ‘से येस टू योग अँड नो टू रोग’ या बी अँड डब्ल्यूएसएससीच्या निवडण्यात आलेल्या संकल्पनेसह आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर, योग संस्थेचे संचालक डॉ. हंसाजी योगेंद्र आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे. यांच्या उपस्थितीत वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल (बी अँड डब्ल्यूएसएससी) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मोनिका बहल यांनी संचालन केलेल्या या वेबिनारचा उद्देश शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक चापल्य सुधारण्यात योगाच्या फायद्यांविषयी व्यापक जागरूकता वाढवणे आणि विशेषत: कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लोकांना योगासने करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.
चिंता आणि तणाव यावर मात करण्यासाठी योगाची भूमिका लोकांना समजावण्यात मदत करण्याव्यतिरिक्त, वेबिनारने तरुणांना योगसाधनेच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या करियरच्या विविध संधींबद्दल देखील लोकांना माहिती दिली. योगाच्या क्षेत्रात रोजगाराच्या विविध संधीचा लाभ घेण्यासाठी युवकांना मदत करण्यासाठी स्किल इंडियाच्या निरंतर प्रयत्नांमुळे 96,196 पेक्षा अधिक उमेदवारांना पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत (पीएमकेव्हीवाय) विविध कौशल्य उपक्रमांद्वारे प्रामुख्याने पूर्व शिक्षण ओळख (आरपीएल), अल्प कालावधी प्रशिक्षण (एसटीटी) आणि विशेष प्रकल्प यासाठी देशभरातील योग प्रशिक्षक आणि ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. योगासाठी तीन विशिष्ट अभ्यासक्रम आहेत - योग प्रशिक्षक (एनएसक्यूएफ 4), योग प्रशिक्षक (स्तर 5) आणि वरिष्ठ योग प्रशिक्षक (स्तर 6). मंत्रालय आणि सौंदर्य आणि स्वास्थ्य कौशल्य परिषद (बी आणि डब्ल्यूएसएससी) ला मदत करणारे आर्ट ऑफ लिव्हिंग आणि पतंजली हे काही महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओदिशा, केरळ, पश्चिम बंगाल ही सर्वाधिक कुशल उमेदवार असलेली राज्ये आहेत. बी आणि डब्ल्यूएसएससीकडे देखील सीबीएसई शाळांसाठी शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून इयत्ता अकरावीपासून योगामध्ये व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु आहे. सर्व राज्यातील समग्र शिक्षा शाळांमध्ये उच्च माध्यमिक विभागासाठी बी आणि डब्ल्यूएसएससीचे योग रोजगार उपलब्ध असतील.आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणाले, योग केवळ अध्यात्माबद्दल नाही; तर ते एक कौशल्य आहे आणि खरं तर उद्योगाशी संबंधित आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील लोक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जात असल्याने योगाचे महत्त्व सध्याच्या काळात अधिक महत्त्वपूर्ण बनले आहे. आपण सर्वांनी या कठीण प्रसंगी योगाचा अवश्य स्वीकार केला पाहिजे कारण यामुळे आपली मानसिक चपळता आणि चैतन्य वाढायला मदत होते , आपल्याला खूप शांत आणि स्थिरचित्त बनवते. योग केवळ एक मुद्रा नाही; योग ही जगण्याची एक शैली आहे. ”
“योगाला प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला अनुसरून एमएसडीईच्या प्रयत्नांचे आभार, योग भारताच्या दुर्गम भागातही पोहोचला आहे. देशाच्या अगदी दुर्गम भागातील लोक कौशल विकास केंद्रांच्या माध्यमातून योग शिकत आहेत. संपूर्ण देशात कौशल्य विकास वेगाने सुरू आहे आणि युवकांसाठी योग एक उत्तम करिअरचा पर्याय बनला आहे, ” असे गुरुदेव म्हणाले.
आपल्या प्राचीन वैदिक परंपरेमध्ये याचे मूळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की गेल्या काही वर्षांत जगभरात आरोग्यासाठी आणि मनःशांतीच्या दृष्टीने योगसाधना ही सर्वात मोठी लोकचळवळ म्हणून उदयास आली आहे. या दृष्टिकोनाला अनुसरून आम्ही योगाच्या क्षेत्रात करिअरच्या विविध संधीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि युवकांच्या आशादायी भविष्यासाठी योगाचा स्वीकर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ब्यूटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल (बी आणि डब्ल्यूएसएससी) बरोबर काम करत आहोत. कोविड -19 नंतरच्या काळात, प्रमाणित योग शिक्षक आणि प्रशिक्षकांची मागणी वाढून संभाव्य कर्मचाऱ्यांना कौशल्य वाढवण्याची तातडीची आवश्यकता भासू शकते. योगाला खरोखर वैश्विक बनविण्यासाठी आणि देशभरातील तरुणांना योगक्षेत्रात आकर्षक करिअरच्या संधी शोधण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ”
योगाच्या लाभांबाबत डॉ. हंसाजी योगेंद्र म्हणाले, “आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण भारतातील कौशल्य विकासाची वाढती गरज आणि आरोग्य आणि निरोगीपणाबाबत आजूबाजूच्या समाजात आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी योगाने कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली यावर चर्चा केली. कोविड महामारीशी लढण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग हे सर्वात सुंदर साधन आहे.
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनअंतर्गत ब्युटी अँड वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिल (बी अँड डब्ल्यूएसएससी), एमएसडीईची अंमलबजावणी करणारी संस्था, अनेक कॉर्पोरेट आणि संघटनांशी सहकार्याद्वारे योग विषयक नोकरीच्या भूमिकेतून कुशल उमेदवारांपर्यंत पोह्चायचा प्रयत्न करत आहे. या भागीदारीत सिडस्को इंटरनेशनल, व्हाइट लोटस आणि आंतरराष्ट्रीय योग आघाडीसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. योगसाधनेत भारतीय तरुणांना कुशल बनवण्यासाठी डॉ. एच. आर. नागेंद्र आणि डॉ. हंसाजी यांच्या उपस्थितीत बी अँड डब्ल्यूएसएससीने योग संस्थेबरोबर सामंजस्य करार देखील केला आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633019)
Visitor Counter : 308