पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पेट्रोलियम क्षेत्रातील मोठी कंपनी ब्रिटीश पेट्रोलियम (BP) पुण्यात जागतिक व्यापार सेवा केंद्र स्थापन करणार
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून निर्णयाचे स्वागत
Posted On:
18 JUN 2020 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2020
पेट्रोलियम क्षेत्रातील जागतिक दर्जाची मोठी कंपनी, ब्रिटीश पेट्रोलियम(bp)पुण्यात जागतिक व्यापारी सेवा केंद्र (GBS) स्थापन करणार आहे, अशी घोषणा कंपनीने यावेळी केली. या नव्या केंद्रात, सुमारे 2000 जणांना रोजगार मिळू शकेल आणि ह्या केंद्रातून ब्रिटिश पेट्रोलियमला जागतिक पातळीवर डिजिटल इनोव्हेशन सहाय्य दिले जाईल. हे केंद्र जानेवारी 2021 पासून कार्यरत होण्याची अपेक्षा आहे. bp च्या जगभरातील व्यापाराला, उद्योग प्रक्रिया आणि अत्याधुनिक विश्लेषणात्मक सहाय्य देण्याची जबाबदारी या केंद्राची असेल.
भारतातील या नव्या केंद्राकडे, थर्ड-पार्टी व्यापारी प्रक्रीयेनुसार,कार्यवाहीसाठीची मालकी असेल आणि पुढे उद्योगविस्तार करण्याच्या हेतूने, या केंद्रातील विश्लेषण आणि डेटा सायन्स क्षमता वाढवली जाईल. भारत हे एक आज वाढती बाजारपेठ असून देशातील डिजिटल गुणवत्ता ही वाढते आहे. या नव्या केंद्रात, bp ला भारतातील डिजिटल क्षेत्रातील गुणवत्ता आपल्याकडे घेणे शक्य होईल, आणि या कंपनीच्या विकासासाठी तसेच भविष्यातील डिजिटल सोल्युशन्ससाठी या गुणवत्तेचा उत्तम वापर करता येईल.
या घोषणेचे स्वागत करतांना, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, “ पुणे शहरात जागतिक व्यापार केंद्र सुरु करण्याच्या bp च्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. हे केंद्र कार्यान्वित झाल्यावर देशातील डिजिटल क्षेत्रातील स्थानिक तरुणांच्या गुणवत्तेला इथे नव्या संधी मिळतील आणि या केंद्रातून सुमारे 2000 लोकांना रोजगार मिळू शकेल”
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1632422)
Visitor Counter : 211