शिक्षण मंत्रालय

राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा( NEET) UG, जुलै-2020 पुढे ढकलण्यात आल्याबद्दलच्या बनावट परिपत्रकाबद्दल राष्ट्रीय परीक्षा संस्थेने दिलेले स्पष्टीकरण


असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याची NTA ची विद्यार्थी आणि पालकांना माहिती

Posted On: 17 JUN 2020 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जून 2020

NTA म्हणजेच, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या असे लक्षात आले आहे की, 15 जून 2020 ही तारीख असलेले एक बनावट सार्वजनिक परिपत्रक, ज्यावर, नीट म्हणजेच, राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश प्रक्रिया चाचणी, UG जुलै-2020 पुढे ढकलण्यात आल्याबद्दल असा विषय लिहिला आहे, हे परिपत्रक विविध माध्यमे आणि समाज माध्यमांवरून पसरवले जात आहे. 

या बनावट परिपत्रकाची NTA ने गंभीर दाखल घेतली असून या बनावट परिपत्रकाचा मूळ स्त्रोत शोधण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थी, पालक आणि एकूणच समाजाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने असे खोटे परिपत्रक तयार करुन ते पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार आहे.

सर्व उमेदवार, पालक आणि सर्वसामान्य लोकांना हे सूचित केले जात आहे की अशाप्रकारचा कुठलाही निर्णय NTA अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. जनतेला अशी विनंती आहे की, अशा चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवू नका, ते पुढे पाठवू नका. सत्य आणि अधिकृत माहितीसाठी NTA च्या www.nta.ac.in आणि ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.

या संदर्भात NTA ने 11 मे 2020 रोजी प्रसिद्ध केलेली शेवटची अद्ययावत माहिती, NTA चे संकेतस्थळ https://data.nta.ac.in/Download/Notice/Notice 20200511063520.pdf. वर उपलब्ध आहे.

पुन्हा एकदा, सर्व उमेदवार, त्यांचे पालक आणि जनतेला अशी विनंती आहे की त्यांनी केवळ NTA च्या www.nta.ac.in आणि  ntaneet.nic.in या दोन संकेतस्थळावर आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा.

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1632078) Visitor Counter : 156