आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती


आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधा वाढविण्याबरोबरच आपत्कालीन सेवा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश

Posted On: 15 JUN 2020 10:44PM by PIB Mumbai

 

कोविड -19 रूग्णांच्या व्यवस्थापनासाठी रुग्णालयात अतिदक्षता खाटा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सोय असलेल्या खाटा इत्यादी बाबींसह आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांची वाढती कमतरता असल्याचे अनेक अहवाल आले आहेत. कोविड -19 उपचारासाठी आरोग्यसेवा प्रदात्यांकडून जास्त पैसे घेतल्याचे अहवालही प्राप्त झाले आहेत.

ही परिस्थिती लक्षात घेता आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने खाजगी आरोग्य सेवा पुरवठादारांबरोबर अद्ययावत खाटांची उपलब्धता आणि आपत्कालीन आरोग्य सेवा सुविधांची सोय करण्यासाठी तसेच पुरविलेल्या सेवांसाठी योग्य व पारदर्शक शुल्काची खात्री करुन घेण्यासाठी राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना संबोधित केले आहे. या संदर्भात काही राज्यांनी पुढाकार घेतला आहे. उचित दर आणि रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी आपत्कालीन सेवा पुरवण्याच्या व्यवस्थेबाबत त्यांनी खाजगी क्षेत्राशी करार केला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पॅकेज (संकेतस्थळ https://pmjay.gov.in वर उपलब्ध) आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचा पॅकेज दर आधीपासूनच राज्यांकडे उपलब्ध आहे. (https://cghs.gov.in/indexl.php?lang=1&level=1&sublinkid=6760&lid=3704).  नंतरचे दर क्षेत्रानुसार निश्चित केले आहेत.

रूग्णांना त्वरित, दर्जात्मक आणि वाजवी दरात आरोग्य सेवा उपलब्ध होत असल्याची खात्री करण्यासाठी राज्यांना स्थानिक खाजगी आरोग्य सेवा पुरवठादारांशी सल्लामसलत करण्याचे आणि किफायतशीर दर ठरविताना आरोग्य सेवा प्रदात्यांकरिता वैयक्तिक सुरक्षा उपकरणांची किंमत विचारात घेण्यास सांगितले आहे. असे सूचित केले गेले आहे की एकदा दर निश्चित केले की व्यापकपणे प्रचार करणे आवश्यक आहे जेणेकरुन रुग्ण आणि सेवा पुरवठा करणारे दोघेही पूर्णपणे जागरूक असतील आणि क्षमतांचा चांगल्या प्रकारे वापर होईल. राज्यांना खाजगी क्षेत्रातील आरोग्य प्रदात्यांचा कृतीशीलतेने सहभाग  घेण्यास तसेच सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचा विचार करण्यास सांगितले गेले आहे कारण यामुळे कोविड -19 रुग्णांना त्वरित, चांगल्या प्रतीची आणि वाजवी आरोग्य सेवा देण्यात मदत होईल.

 

S.Tupe/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1631855) Visitor Counter : 204