इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीपूर्ण व मानव-केंद्री विकास आणि वापराला समर्थन देण्यासाठी संस्थापक सदस्य म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जागतिक भागीदारीत (जीपीएआय) भारत सहभागी

Posted On: 15 JUN 2020 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जून 2020

 

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जागतिक भागीदारी (जीपीएआय किंवा जी-पे ) सुरू करण्यासाठी भारत आज अमेरिका, ब्रिटन, युरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, न्यूझीलंड, कोरिया, सिंगापूर यांसारख्या आघाडीच्या प्रमुख अर्थव्यवस्थांच्या लीगमध्ये सहभागी झाला. मानवी हक्क, समावेश, विविधता, नाविन्य तसेच आर्थिक वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीपूर्ण विकास आणि वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 'जीपीएआय' हा आंतरराष्ट्रीय व अनेक हितधारकांचा उपक्रम आहे. सहभागी देशांचा अनुभव आणि विविधता वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आसपासची आव्हाने आणि संधी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित प्राधान्यक्रमांवर आधारित उपक्रमांना सहाय्य करून कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित सिद्धांत आणि कृती यांच्यातील अंतर कमी करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न असेल.

भागीदार आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या सहकार्याने, जीपीएआय कृत्रिम बुद्धिमतेच्या जबाबदार उत्क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग, नागरी समाज, सरकारे आणि शैक्षणिक क्षेत्रातील आघाडीच्या तज्ञांना एकत्र आणेल; तसेच कोविड -19च्या विद्यमान जागतिक संकटाला चांगला प्रतिसाद देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा लाभ घेता येऊ शकतो, हे दर्शविण्यासाठी कार्यपद्धती विकसित करेल.

हे नमूद करण्यासारखे आहे की भारताने अलिकडेच राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणि राष्ट्रीय नॅशनल कृत्रिम बुद्धिमत्ता पोर्टल सुरू केले आहे; तसेच विकासाला पूरक मानवी दृष्टिकोनाचा समावेश आणि सबलीकरणासह शिक्षण, कृषी, आरोग्य सेवा, ई-कॉमर्स, वित्त पुरवठा , दूरसंचार इत्यादी विविध क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ उठवण्यास  सुरवात केली आहे. संस्थापक सदस्य म्हणून जीपीएआयमध्ये सामील झाल्यामुळे समावेशक वाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुभवाचा फायदा घेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक विकासात भारत सक्रियपणे सहभागी होईल. 

जीपीएआयला सचिवालय सहाय्य करेल; आर्थिक सहकार आणि विकास संघटना (ओईसीडी) पॅरिसमध्ये तसेच तज्ञांची दोन केंद्रे मॉन्ट्रियल आणि पॅरिसमध्ये यजमानपद भूषवतील.


* * *

S.Pophale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631703) Visitor Counter : 304