विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आरोग्यसेवा पुरवठा साखळीत आपत्कालीन पुरवठ्याच्या वास्तविक-वेळेतील उपलब्धतेसाठी 'आरोग्यपथ' हे पोर्टल सुरु
Posted On:
13 JUN 2020 4:40PM by PIB Mumbai
आपत्कालीन आरोग्य सेवा पुरवठा वास्तविक वेळेत उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने 12 जून, 2020 रोजी राष्ट्रीय आरोग्यसेवा पुरवठा साखळी पोर्टल https://www.aarogyapath.in सुरु केले.
उत्पादक, पुरवठादार आणि ग्राहकांना हे पोर्टल सेवा देईल. कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या राष्ट्रीय आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत, जिथे पुरवठा साखळीत चिंताजनक व्यत्यय येत आहे, तेथे आपत्कालीन आरोग्यसेवा उत्पादन आणि वितरण क्षमतेशी विविध कारणांमुळे तडजोड केली जाऊ शकते. या आव्हानांना सामोरे जाताना एखाद्याला आरोग्याचा (निरोगी आयुष्याचा) मार्ग दाखविण्याच्या दृष्टीकोनातून "आरोग्यपथ" नावाचे माहिती व्यासपीठ विकसित केले गेले.
महत्वपूर्ण आरोग्य सेवांची उपलब्धता एकाच ठिकाणी प्रदान करणारे हे एकात्मिक सार्वजनिक व्यासपीठ ग्राहकांना नियमितपणे अनुभवाला येणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात उपयुक्त ठरू शकते. या समस्यांमध्ये मर्यादित पुरवठादारांवर अवलंबून असणे, चांगल्या प्रतीची उत्पादने ओळखण्यासाठी वेळ घेणारी प्रक्रिया, अपेक्षित वेळेत वाजवी दराने प्रमाणित उत्पादनांचा पुरवठा करणार्या पुरवठादारांना मर्यादित प्रवेश, नव्याने सुरु झालेल्या उत्पादनांच्या संदर्भात जागरूकता नसणे, इत्यादी समस्यांचा समावेश आहे.
रोगनिदान प्रयोगशाळा, वैद्यकीय दुकाने, रुग्णालये इत्यादींसारख्या संभाव्य मागणी केंद्रांमधील संपर्कातील अंतरांवर मात करुन हे उत्पादक आणि पुरवठादारांना विविध ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्यास मदत करते. खरेदीदारांची संख्या आणि नवीन उत्पादनांसाठी आवश्यकता वाढल्याने हे विस्ताराच्या संधी देखील निर्माण करेल. कालांतराने, या व्यासपीठावरील विश्लेषकांकडून उत्पादकांना जास्त क्षमता तसेच कमतरतेच्या बाबतीत लवकर संकेत तयार करणे अपेक्षित आहे. अयोग्य अंदाज आणि जादा उत्पादनामुळे संसाधनांचा होणारा अपव्यय कमी करण्यास हे मदत करेल; तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या मागणीबद्दल जागरूकता निर्माण करेल.
'सीएसआयआर'ची अपेक्षा आहे की, भारतात आरोग्यसेवांची उपलब्धता आणि परवडणारी आरोग्य साधने या माध्यमातून रुग्णांना सेवा देताना शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी 'आरोग्यपथ' हे भविष्यात सर्वांच्या पसंतीचे राष्ट्रीय आरोग्यसेवा माहिती व्यासपीठ ठरावे.
'सीएसआयआर'चे महासंचालक डॉ शेखर सी. मंडे यांच्या उपस्थितीत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी राजेश भूषण यांनी हे पोर्टल सुरु केले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहसचिव सुधीर गर्ग आणि औषध निर्माण शास्त्र तज्ज्ञ डॉ विजय चौथियावाले या कार्यक्रमास अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. शेखर मंडे यांनी पोर्टलच्या विकासात गुंतलेल्या सीएसआयआर टीमची पूरक माहिती दिली, ज्याचे नेतृत्व सीएसआयआर-आयआयपीचे संचालक डॉ. अंजन रे यांनी केले. हे पोर्टल सर्वोदय इन्फोटेक आणि संस्थात्मक वापरकर्त्यांसह भागीदारीने विकसित केले गेले आहे; तसेच अत्यावश्यक आरोग्य सेवा वस्तूंचे उत्पादक / अधिकृत पुरवठादार यांना नोंदणी आणि सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
S.Pophale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631369)
Visitor Counter : 359