नौवहन मंत्रालय

नौवहन मंत्रालयाकडून अंदमान व निकोबार बेटांवरील जहाज बांधणी आणि दुरुस्ती करण्यासाठी 123.95 कोटी रुपयांच्या सुधारीत निधीला मान्यता

Posted On: 12 JUN 2020 2:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 जून 2020

 

नौवहन मंत्रालयाने अंदमान व निकोबार बेटांवरील जहाज बांधणी आणि दुरुस्ती करण्यासाठी 123.95 कोटी रुपयांचा सुधारीत निधी देण्याला मान्यता दिली आहे.

अंदमान व निकोबार बेटांवरच्या जहाजांतून माल भरण्याचे तसेच  जहाजांवरील इतर कामे, ही येथील जीवनरेखा आहे; कारण ही सर्व कामेच तेथील विकासाशी निगडीत आहेत. जलवाहतूकीसाठीचे हे कार्य सुरळीतपणे चालू रहाण्यासाठी जहाजांची दुरुस्ती करणे गरजेचे असते. जलवाहतूकीत कमालीची वाढ झाल्यामुळे, नौवहन मंत्रालयाने पोर्ट ब्लेअर येथील सध्या असलेल्या जहाज दुरुस्तीच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याचे ठरविले आहे. सध्याच्या बंदराची लांबी 90 मीटरने वाढवण्यात येईल. या सुधारणेमुळे जहाजे बांधणी आणि जहाजे दुरुस्त करणे, याला चालना मिळेल; तसेच भारत सरकारच्या 'मेक इन इंडिया' चळवळीला गती मिळेल.

दक्षिण अंदमान मधल्या पोर्ट ब्लेअर येथील मरीन डॉकयार्ड इथल्या ड्राय डॉक पंप आणि त्याला पूरक अशी साधने यांचा पुरवठा करणे, ती बसविणे आणि त्याची कंत्राटे देणे, या ड्राय डॉक योजनेला या आधीच फेब्रुवारी  2016 साली 42 महिन्यांत पूर्ण करण्याच्या अटीवर नौवहन मंत्रालयाने केंद्रीय क्षेत्रीय योजनेअंतर्गत त्यांची गरज ओळखून 96.24 कोटी रुपये इतका निधी दिला होता. जास्तीत जास्त जहाजे सामावून घेण्यासाठी 90 मीटरने बंदराची लांबी वाढविण्याचा या योजनेत समावेश होता. सुधारणेमुळे  पोर्ट ब्लेअर येथील जहाजे दुरुस्ती करण्याची क्षमता दुप्पट होऊन द्वीपावरील रहिवाश्यांना रोजगार मिळून त्यांच्या मिळकतीत वाढ होणे अपेक्षित होते. या योजनेचे प्राथमिक काम त्या स्थानी दि. 7 मार्च 2017 पासून सुरु होऊन त्याला बक्षिसही मिळाले होते.

काही तांत्रिक अडचणींमुळे या योजनेला लागणारा कालावधी आणि त्याचा खर्च यात वाढ झाली. नौवहन मंत्रालयाने आता या निधीत वाढ करून आता 123.95 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.


* * *

S.Pophale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631105) Visitor Counter : 182