विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरण (एसटीआयपी) 2020 साठी सार्वजनिक आणि तज्ञांचा सल्ला ‘टाऊन हॉल मिट’ होणार सुरु


उच्च  प्रक्रिया चार ही संलग्नीत मार्गावर जोडली असून जी धोरण निर्मितीत सल्लामसलतीद्वारे अंदाजे 15000 हिताधारकांपर्यंत पोहोचेल

Posted On: 10 JUN 2020 2:28PM by PIB Mumbai

 

एसटीआयपी 2020 टाऊन हॉल मीट, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्य धोरण (एसटीआयपी) 2020 तयार करण्यासाठी ट्रॅक-1 सार्वजनिक आणि तज्ञ सल्लामसलत प्रक्रिया, 12 जून 2020 रोजी भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक के विजय राघवन आणि डीएसटीचे सचिव प्राध्यापक आशुतोष शर्मा यांच्या हस्ते सुरू केली जाईल.

ट्रॅक I सल्लामसलत प्रक्रियेमध्ये विज्ञान धोरण मंचाच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सार्वजनिक आणि तज्ञ सल्लामसलत करतात, हे एक समर्पित व्यासपिठ आहे जिथे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि तज्ञ गटांकडून माहिती मागविण्यासाठी विनंती केली जाते, ज्याचा उपयोग एसटीआयपी 2020 चे विकेंद्रीकरण करून त्याला सर्वसमावेशक बनविण्यासाठी केले जाते. एसटीआयपी 2020 सचिवालयाचे प्रमुख आणि डीएसटी सल्लागार डॉ. अखिलेश गुप्ता हे देखील या सल्लामसलत कार्यक्रमाला उपस्थित असतील.

भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार यांचे कार्यालय (पीएसएचे कार्यालय) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) यांनी नवीन राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष धोरण (एसटीआयपी 2020) तयार करण्यासाठी अधिकाधिक हितधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी सल्लामसलत प्रक्रिया सुरू केली आहे.

ट्रॅक I मध्ये विचारवंत आणि धोरण तज्ञांसह सार्वजनिक संवाद मालिका, सार्वजनिक सहभागासह संकल्पनात्मक गटचर्चा, लक्ष्यित सर्वेक्षण साधने, लिखित सामग्रीसाठी प्रिंट मीडिया लेख आणि चॅनेल, शेवटच्या मैलावरील कनेक्टिव्हिटीसाठी कम्युनिटी पॉडकास्ट यांचा समावेश असेल.

एसटीआयपी 2020 सूत्रीकरण प्रक्रिया 4 उच्च एकमेकांशी जोडलेल्या मार्गावर आयोजित केली आहे, जी धोरण तयार करण्यामध्ये सल्लामसलत करण्यासाठी अंदाजे 15000 हिताधारकांपर्यंत पोहोचेल. ट्रॅक I सल्लामसलत प्रक्रियेमध्ये विज्ञान धोरण मंचाच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सार्वजनिक आणि तज्ञ सल्लामसलत करतात, हे एक समर्पित व्यासपिठ आहे जिथे धोरण मसुदा प्रक्रीये दरम्यान आणि नंतर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि तज्ञ गटाकडून माहिती मागविण्यासाठी विनंती केली जाते. ट्रॅक II मध्ये धोरण मसुदा प्रक्रियेत पुरावा-सूचित केलेल्या शिफारशींचा समावेश करण्यासाठी तज्ञांनी दिलेले संकल्पनात्मक सल्ले असतात. या उद्देशाने 21लक्ष केंद्रित संकल्पनात्मक गट स्थापन करण्यात आले आहेत. ट्रॅक III मध्ये मंत्रालये आणि राज्ये यांच्याशी सल्लामसलत केली जाते, तर ट्रॅक IV उच्च स्तरीय बहु-हितधारक सल्लामसलत करतात.

वेगवेगळ्या ट्रॅकवरील सल्लामसलत प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली असून त्या समांतर चालू आहेत. ट्रॅक - II संकल्पनात्मक गटाची (टीजी) सल्लामसलत प्रक्रिया माहिती शृंखलेपासून सुरू झाली आहे आणि तज्ञ तसेच लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी ट्रॅक- I सुरु केले जाईल.

संपूर्ण प्रक्रियेचे समन्वय साधण्यासाठी डीएसटी (तंत्रज्ञान भवन) येथे डीएसटी-एसटीआय धोरण सहकाऱ्यांच्या कॅडरसह अंतर्गत धोरण ज्ञान आणि डेटा सपोर्ट युनिट असलेले सचिवालय स्थापन केले आहे.

*****

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630627) Visitor Counter : 293