सांस्कृतिक मंत्रालय

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचा 8 जून ते 3 जुलै या कालावधीत ऑनलाईन 'नैमिष 2020' उपक्रम


ऑनलाईन 'नैमिष 2020' कार्यक्रमांतर्गत चार कार्यशाळांचे आयोजन

Posted On: 07 JUN 2020 5:32PM by PIB Mumbai

 

नवी दिल्लीतल्या  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टने ( एनजीएमए ) 8 जून 2020 ते 3 जुलै 2020 या कालावधीत ऑनलाईन 'नैमिष' 2020 उपक्रम आयोजित केला आहे. सध्या  साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि लॉकडाऊन दरम्यान संग्रहालये आणि सांस्कृतिक संस्था अभ्यागत आणि प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे  सेवा देऊ शकत नाहीत. यामुळे एनजीएमएने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवे मंच शोधले.  गेल्या दोन महिन्यांत एनजीएमएने अनेक व्हर्चुअल कार्यक्रम आणि प्रदर्शन  आयोजित केली. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे  असे  कार्यक्रम डिजिटल पद्धतीने आयोजित करण्याची संधी मिळत आहे.  'नैमिषहा आपला सर्वाधिक  लोकप्रिय ग्रीष्मकालीन  कला उपक्रम डिजिटल पद्धतीने आयोजित करण्याचा प्रयत्न एनजीएमए करत आहे.

एनजीएमए, नवी दिल्लीचा हा महिनाभराचा उपक्रम सहभागींना आपल्या आरोग्याशी तडजोड न करता शिकण्याची आणि सरावाची संधी पुरवत आहे. सर्वसमावेशक अशा चार कार्यशाळांचे नियोजन एनजीएमएने केले आहे.   या कार्यशाळेची घोषणा 1 जून रोजी करण्यात आल्यानंतर  600 हून अधिक सहभागींनी  नोंदणी करत  चांगला प्रतिसाद दिला. ऑनलाईन नैमिश 2020 उपक्रमात  चित्रकला कार्यशाळा, शिल्पकला कार्यशाळा, प्रिंटमेकिंग आणि इंद्रजाल - मॅजिक ऑफ आर्ट (स्वातंत्र्य समजण्यासाठी आंतरशाखा  सर्जनशील कार्यशाळा) या चार कार्यशाळेचे आयोजन 8 जून ते 3 जुलै 2020 या कालावधीत  केले जाईल. ऑनलाइन कार्यशाळेचे सत्र दोन गटात होईल.  गट एक : 6 वर्षे ते 15  वर्षे असून त्याची वेळ  सकाळी 11 ते सकाळी 11.35 असेल.  16 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयासाठीच्या व्यक्तींसाठी गट दोन असून त्यांच्यासाठी वेळ संध्याकाळी 4 ते सायंकाळी 4. 35 असेल.

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे महासंचालक  अद्वैतचरण गडनायक म्हणाले, "नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) चा  पहिला  महासंचालक म्हणून मी संग्रहालये लोकांसाठी व्हर्च्युअली  उपलब्ध करून देण्याच्या  ठाम मताचा आहे.  आपल्या  समाजातील सर्व घटकांना संग्रहालय आणि  त्यांच्या उपक्रमात सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने  ग्रीष्मकालीन  कला कार्यक्रम २०२० हे एक पाऊल आहे.   सोमवारपासून मी माझ्या ज्येष्ठ-कनिष्ठ कलाकारांसह आपल्या स्क्रीनवर आपल्यापर्यंत पोहोचेन  आणि आपण  सर्वजण एकत्रितपणे कलानिर्मितीचा  प्रयत्न करू.  उपक्रमाचे  शीर्षक 'नैमिषहे पवित्र स्थान दर्शवितो जिथे लोक आपली  श्रद्धा किंवा भक्ती अर्पित करतात. एनजीएमएच्या उपक्रमांची  व्याप्ती वाढवावी असे मला वाटते.  विशेषत: शिक्षण क्षेत्रात संस्था म्हणून आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे,असे मला वाटते."

नैमिष 2020 ग्रीष्मकालीन कला उपक्रमातील  निवडक कलाकृतींचे प्रदर्शन SO -HAM या एनजीएमएच्या सांस्कृतिक माध्यम मंचावर लवकरच रसिकांसाठी व्हर्च्युअली खुले  होईल.

उपक्रमांबाबतचा सविस्तर  तपशील एनजीएमएच्या अधिकृत वेबसाइट आणि फेसबुक पेजवर  उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी  कृपया येथे भेट द्या:

एनजीएमए संकेतस्थळ : http://ngmaindia.gov.in/

NGMA, NEW DELHI FACEBOOK PAGE: https://www.facebook.com/ngmadelhi

एनजीएमए ट्विटर: https://twitter.com/ngma_delhi

 

M.Jaitly/S.Kakade/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630066) Visitor Counter : 311