कोळसा मंत्रालय
कोल इंडियाची शाखा असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स कडून तीन नव्या कोळसा खाणींचे उद्घाटन
कर्मचारी आणि हितसंबंधीमध्ये डिजिटल संपर्कासाठी ‘संवाद’ एपचे उद्घाटन
WCL आय खाणकामावर देखरेख ठेवणार
Posted On:
06 JUN 2020 6:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2020
कोल इंडियाची ची उपशाखा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड ने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात आपल्या तीन नव्या खाणी आज सुरु केल्या. या तिन्ही खाणींची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता, 2.9 दशलक्ष मेट्रिक टन इतकी आहे.या तिन्ही खाणींमध्ये कंपनी, एकूण 849 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवणार असून या खाणींमधून 647 जणांना थेट रोजगार मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि केंद्रीय कोळसा आणि खाणकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते संयुक्तरीत्या विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या खाणींचे उद्घाटन झाले.
“वेस्टर्न कोलफिल्ड्चे, आर्थिक वर्ष 2023-24 पर्यंत, 75 मेट्रिक टन कोळसा उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे. या खाणी सुरु केल्यास उद्दिष्टाचा मैलाचा दगड गाठण्यात निश्चितच मदत होईल आणि कोल इंडिया ला वित्तीय वर्ष 2023-24 पर्यंत 1 अब्ज टन कोळसा उत्पादन करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल.” असे प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितले.
आज उद्घाटन तीन खाणींपैकी, 1) आदासा खाण- भूमिगत आणि उघडी खाण, महराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात आहे. 2)सारडा भूमिगत खाण, कन्हान भागात आणि 3) धनकसा भूमिगत खाण, मध्यप्रदेशातील पेंच भागात आहे. आदासा खाणीची वार्षिक उत्पादन क्षमता, 1.5 मेट्रिक टन इतकी आहे आणि सारडा तसेच धनकासा खाणींची वार्षिक क्षमता अनुक्रमे 0.4 आणि 1 मेट्रिक टन इतकी आहे.
कंपनीने खाणकामावर देखरेख ठेवण्यासाठी WCL आय नावाची एक निरीक्षण यंत्रणा आणि ‘संवाद’ नावाचे एप देखील सुरु केले आहे. या एपवरुन कर्मचारी आणि इतर सर्व हितसंबंधीयांना परस्परांशी संवाद साधता येणार आहे.
WCL आय कंपनीच्या 15 प्रमुख खाणकामांवर, जिथे कंपनीच्या एकूण कोळसा उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन होतं, त्या कामांवर देखरेख ठेवेल.यामुळे कोळशाचा एकूण साठा, उपलब्धता, रेक्सची आवश्यकता आणि रेल्वेमध्ये होणारे लोडिंग अशा सराव गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवता येईल.
संवाद हे मोबाईल आणि डेस्कटॉप एप असून ते कर्मचारी आणि हितसंबंधी लोकांसाठी आहे. या एपच्या मार्फत, सूचना/सल्ला/ अनुभव इत्यादींचे आदानप्रदान करण्यासाठी एक आभासी प्लाटफॉर्म उपलब्ध होऊ शकेल. या एप वर विचारलेल्या शंकांना त्वरित प्रतिसाद पथक सात दिवसांच्या आत उत्तर देईल
कोल इंडियाच्या मध्यप्रदेशातील उपशाखांनी मध्यप्रदेश सरकारला कोविडचा सामना करण्यासाठी 20 कोटी रुपये दिले आहेत, असे जोशी यांनी सांगितले. कोल इंडियाकडून महाराष्ट्र सरकार लाही येत्या एक दोन दिवसांत 20 कोटी रुपयांचा मदतनिधी दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
चालू आर्थिक वर्षात कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी WCL ने ‘मिशन 100 डेज’ हा आराखडा तयार केला आहे. यातून कंपनीला आपल्या मध्यम आणि दीर्घकालीन उद्दिष्टपूर्तीतही मदत होईल. चालू आर्थिक वर्षात कंपनीचे 62 मेट्रिक टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.
WCLच्या भविष्यातील योजनेनुसार 2023-24 पर्यंत 20 नवे कोळसा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यातील 14 प्रकल्प महाराष्ट्रात तर 6 मध्यप्रदेशात सुरु केले जाणार आहेत, त्याचाच भाग म्हणून, आजच्या तीन खाणी सुरु करण्यात आल्याचे जोशी यांनी सांगितले.
गेल्या सहा वर्षात कंपनीने 20 नवे आणि विस्तारित प्रकल्प सुरु केले आहेत. WCL ने वर्ष 2019-20 मध्ये 57.64 मेट्रिक टन कोळसा उत्पादन केले जे गेल्या वर्षीपेक्षा 8% टक्के अधिक आहे.
* * *
M.Jaitly/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1629917)
Visitor Counter : 358