ऊर्जा मंत्रालय

'एनएचपीसी'ने साजरा केला ‘जागतिक पर्यावरण दिन 2020’


केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाच्या वतीने साधारण 700 औषधी रोपांचे आणि वनस्पतींचे कर्मचाऱ्यांना वाटप

Posted On: 05 JUN 2020 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2020

भारतातील महत्त्वाची जलविद्युत कंपनी आणि ऊर्जा मंत्रालयाअंतर्गतचा केंद्रीय सार्वजनिक उपक्रम असलेल्या, 'एनएचपीसी'च्या वतीने त्यांच्या व्यावसायिक कार्यालयात आणि सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये, वीज केंद्रांमध्ये आणि प्रकल्प स्थानी 5 जून 2020 रोजी 'जागतिक पर्यावरण दिन 2020' खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

एनएचपीसी कार्यालयातील या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'हर्बल पार्क'चे उद्घाटन. एनएचपीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ए. के. सिंह यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ झाला. प्रकल्पांचे संचालक रतीश कुमार, मनुष्यबळ विभागाचे संचालक एन. के. जैन, वित्त विभागाचे संचालक एम. के. मित्तल, तंत्र विभागाचे संचालक वाय. के. चौबे आणि मुख्य दक्षता अधिकारी ए. के श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते. वनस्पती आणि औषधी वनस्पतींचे वैद्यकीय महत्त्व कर्मचाऱ्यांना समजावे आणि त्यांच्यात जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हे औषधी वनस्पतींचे उद्यान उभारण्यात आले आहे. या उत्सवादरम्यान वैविध्यपूर्ण औषधी वनस्पतींचे रोपण यावेळी मुख्य व्यवस्थापकीय संचालक, संचालक आणि मुख्य दक्षता अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

कर्मचाऱ्यांमध्ये 700 रोपांचे आणि औषधी वनस्पतींचे वाटप करणे, हा देखील या उत्सवामधील एक महत्त्वाचा उल्लेखनीय भाग होता, जेणेकरून पर्यावरणाच्या उद्देशाने त्यांना प्रोत्साहित करता यावे आणि त्यांच्यात पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी. एनएचपीसीचे व्यावसायिक कार्यालय आणि फरिदाबाद येथील निवासी संकुल वगळता, एनएचपीसीच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये, प्रकल्पांच्या ठिकाणी आणि वीज केंद्रांच्या जागी सुरक्षित शारीरिक अंतराचे नियम लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली.

जगभरात जनजागृती करण्यासाठी, पर्यावरणाप्रति प्रोत्साहित करण्यासाठी आणि आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन 2020 हा व्यापक प्रमाणात जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला. 'जैवविविधता' हा यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य विषय होता.

 

S.Pophale/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629693) Visitor Counter : 139