Posted On:
04 JUN 2020 8:45PM by PIB Mumbai
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप एस. पुरी यांनी नवी दिल्ली इथे 4 जून 2020 ला संयुक्तपणे “ट्युलिप” नामक नवा उपक्रम सुरु केला. अशा प्रकारचा उपक्रम देशात प्रथमच सुरु होत असून, “ट्युलिप” अर्थात “द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्रॅम”द्वारे देशभरातील सर्व शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांमध्ये नव्याने पदवीधर झालेल्या उमेदवारांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमासाठीच्या विशेष पोर्टलचे देखील या प्रसंगी उद्घाटन करण्यात आले. मनुष्यबळ विकास विभागाचे सचिव अमित खरे, गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार विभागाच्या सचिव दुर्गा शंकर मिश्रा, अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे आणि दोन्ही मंत्रालये आणि शिक्षण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
https://twitter.com/DrRPNishank/status/1268433318833319936
राष्ट्रउभारणीच्या कामात देशातील युवकांमध्ये असलेली क्षमता वापरण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून या उपक्रमाची आखणी केली आहे असे पोखरियाल यांनी या प्रसंगी सांगितले. ट्युलिप उपक्रमामुळे देशातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवता येईल आणि विद्यार्थ्यांकडील नव्या कल्पनांचा तसेच अभिनव विचारांचा नव्या भारताच्या उभारणीत पुरेपूर उपयोग करून घेता येईल.
जागतिक स्तरावरील गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडोब यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखपदी असणाऱ्या व्यक्ती मुळात भारतीय आहेत त्यामुळे भारतात बुद्धिमान व्यक्तींची कमतरता नाही अशा शब्दात त्यांनी देशातील युवकांचे कौतुक केले. ट्युलिप उपक्रम देशभरातील 4400 शहरी स्थानिक संस्था आणि स्मार्ट शहरांच्या यंत्रणेत उपलब्ध असलेल्या इंटर्नशिपच्या संधी मिळवून देईल. तसेच या मंचाद्वारे तरुणांना शहरी स्थानिक संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव पद्धतींच्या माध्यमातून सुधारणा घडवून आणण्यासाठी नव्या कल्पना राबवता येतील.
ट्युलिप उपक्रमाद्वारे पहिल्याच वर्षी 25000 नव्या पदवीधरांना इंटर्नशिप करता येईल अशी अपेक्षा आहे, असे गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप एस. पुरी यांनी या उपक्रमाची तपशीलवार माहिती देताना सांगितले. यातून विद्यार्थ्यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव तर मिळेलच, शिवाय त्यातून विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाचा उत्तम स्त्रोत निर्माण होईल.
ट्युलिप उपक्रमात सहभागी होण्यासाठी बी.टेक., बी.आर्च.,बी.प्लान.,बी.एस.सी. इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या पदवीधरांनी पदवी प्राप्त केल्यापासून 18 महिन्यांच्या आत खालील लिंकद्वारे अर्ज करावा:
https://internship.aicte-india.org/module_ulb/Dashboard/TulipMain/index.php
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना केलेल्या “आकांक्षित भारत” संकल्पनेच्या अनुसार केंद्र सरकारने या उपक्रमाची बांधणी केली आहे. येत्या काळात जगातील सर्वात जास्त कार्यक्षम मनुष्यबळ आपल्या देशात असणार आहे, त्यामुळे त्याचा अधिकाधिक फायदा करून घेण्यासाठी ट्युलिपची मोठी मदत होणार आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान विषयांशी संबंधित पदवीधर उपलब्ध आहेत, त्यांचा व्यावसायिक पातळीवर विकास घडविण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष जगातील प्रकल्पांचे नियोजन तसेच अंमलबजावणीचा अनुभव मिळणे आवश्यक आहे. नुसत्या पुस्तकी शिक्षणातून समाजातील उत्पादनक्षम ज्ञानाची सखोल माहिती मिळवणे अवघड आहे. खऱ्या ज्ञानार्जनासाठी आपल्या समाजातील “शिकून करण्याच्या”पद्धतीपेक्षा “करून शिकणे” या संकल्पनेवर आधारित असायला हवे या उद्देशाने “ट्युलिप”ची सुरुवात करण्यात आली आहे.
मनुष्यबळ विकास विभाग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाने 2025 सालापर्यंत १ कोटी उमेदवारांसाठी इंटर्नशिप कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने ट्युलिप उपक्रम हे अत्यंत महत्त्वाचे पाउल टाकले आहे. ट्युलिपसाठीचा डिजिटल मंच प्रत्येकाला स्वतःच्या पसंतीप्रमाणे वापरता येणार असून शहरी स्थानिक संस्था, स्मार्ट शहरे व्यवस्थापन आणि इंटर्नशिप करणारे विद्यार्थी या सर्वांनासाठी उपयुक्त आहे.
ट्युलिप उपक्रमाच्या सुलभ अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली असून त्याद्वारे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट, पात्रतेच्या अटी, इंटर्नशिपचा कालावधी, नेमणूकीच्या शर्ती, वाहतूक व्यवस्था आणि उपक्रमाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक इतर मुद्द्यांबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
राज्य सरकार आणि केंद्रशासित विभागांच्या प्रशासनाला स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या संधी आणि आव्हानांविषयी उत्तम कल्पना असल्यामुळे त्यांना आवश्यक असलेल्या क्षेत्रांमध्ये ते ट्युलिप उपक्रमाची उत्तम अंमलबजावणी करू शकतात याचा विचार करून गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार मंत्रालयाने त्यांना ट्युलिप उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे.
https://internship.aicte-india.org/module_ulb/Dashboard/TulipMain/index.php
M.Jaitly/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com