राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि जॉर्जियाच्या राष्ट्रपती यांच्यात दूरध्वनी संभाषण

Posted On: 03 JUN 2020 11:38PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 जून 2020

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि जॉर्जियाच्या राष्ट्रपती सालोमी  जरूबिचविली यांच्यात आज दूरध्वनीवरून  संभाषण झाले.यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधाबाबत चर्चा केली.

जॉर्जिया समवेत असलेले स्नेह आणि  मैत्रीपूर्ण संबंध भारतासाठी मौल्यवान असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.व्यापार, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या संबंधाकडे दोन्ही देशांनी   अधिक लक्ष देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धी या क्षेत्रात जॉर्जिया समवेत सहकार्य वाढवण्यात  भारताला आनंदच आहे.

 कोविड-19 मुळे जगासमोर ठाकलेल्या आव्हानांची आणि जगभरातल्या लोकांच्या जीवनात निर्माण झालेल्या अडथळ्याची  दखल घेत, कोविड-19 चा प्रसार रोखण्यात जॉर्जियाचे प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी भारताने जोमदार प्रयत्न केले असून त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

कोविड-19 विरोधातल्या लढ्यात जागतिक प्रयत्नांना गती देण्यात भारत आघाडीवर राहिला असून  150 हून अधिक देशांना भारताने वैद्यकीय मदत पुरवली आहे.आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्रित काम केले पाहिजे असे मत या नेत्यांनी व्यक्त केले.

जॉर्जियामधे भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने असून त्यामधले बरेच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेतअसल्याचा उल्लेख करत त्यांना मायदेशी आणण्यासाठी आणि जॉर्जियात राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी  केलेल्या सहकार्याबद्दल राष्ट्रपतींनी जॉर्जियाच्या सरकारचे आभार मानले.

 

M.Jaitly/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629317) Visitor Counter : 295