ऊर्जा मंत्रालय
कोविड-19 विरुद्धच्या लढाईत पीएफसी उत्तराखंड सरकारला पुरवणार पीपीई किट्स आणि रुग्णवाहिका
Posted On:
30 MAY 2020 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2020
कोविड-19 विरुद्धच्या लढाईत अजून एक महत्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय ऊर्जा मंत्रालया अंतर्गत कार्यरत केंद्रीय सार्वजनिक उद्यम आणि देशाची अग्रणी एनबीएफसी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी) उत्तराखंड सरकारला 1.23 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी पुढे सरसावली आहे.
या निधीचा उपयोग आघाडीच्या कर्मचाऱ्यांसाठी 500 पीपीई किट्स आणि उत्तराखंड सरकारच्या आरोग्य विभागासाठी 6 सुसज्ज रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी केला जाईल.
इतकेच नव्हे तर पीएफसीच्या सीएसआर (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी) उपक्रमांतर्गत कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी उत्तराखंडच्या लढाईत या राज्याला आवश्यक सहकार्य केले जाईल.
* * *
S.Thakur/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1628136)
Visitor Counter : 276